
no images were found
शुभांगी अत्रे ने मनिषा कोईराला कडून घेतली प्रेरणा
एण्ड टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’प्रेक्षकांना सतत विनोदी व मनोरंजनपूर्ण एपिसोड्सचा आनंद देत आहे. नवीन एपिसोडमध्ये शुभांगी अत्रे साकारत असलेली भूमिका मोहक अंगूरी भाबी मोहक, पण प्रेमात वेडी असलेल्या वेश्याची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे, जेथे अंगूरी भाबी मालिकेमध्ये बेगम अनाराच्या मोहक अवतारामध्ये दिसणार आहे. या भूमिकेबाबत सांगताना शुभांगी अत्रेम्हणाल्या, “मला नेहमी काहीतरी नवीन आणि उत्साहवर्धक करायला आवडते. या मालिकेमुळे मला विविध गोष्टी करण्याची आणि माझ्या लुकसोबत प्रयोग करण्याची संधी मिळते. नवीन एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मी बेगम अनाराच्या भूमिकेत पाहायला मिळेल, जी प्रेमात वेडी आहे. बेगम अनाराची भूमिका साकारण्याचा अनुभव माझ्यासाठी धमाल राहिला आहे. मला सांगावेसे वाटते की, आकर्षक पोशाख व पारंपारिक आभूषणे परिधान करण्यामधून मला शाही असल्यासारखे वाटले. वेश्याची मोहकता व चमक धारण करणे सोपे नाही, पण कथानकामधील विनोदाने तो प्रवास आनंदमय झाला. माझे सह-कलाकार टेक्सदरम्यान हसून-हसून लोटपोट झाले आणि मी देखील! सेटवरील केमिस्ट्री उत्साहवर्धक होती, जेथे प्रत्येकजण खीरामंडी एपिसोडच्या उत्साहामध्ये सामावून गेले आणि पडद्यामागील विनोदी गप्पांनी पडद्यावरील विनोदाला अधिक वास्तविक बनवले. हा विनोदी एपिसोड प्रेक्षकांना निश्चितच अचंबित करेल.”
शुभांगी यांनी संजय लीला भन्साळीदिग्दर्शित चित्रपट ‘हिरामंडी’मधील वेश्याच्या भूमिकेसाठी बॉलिवुड अभिनेत्री मनिषा कोईराला यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “मी अविश्वसनीय मनिषा कोईरालाजी यांचा अभिनय पाहून प्रेरित झाले, ज्यांनी चित्रपट ‘हिरामंडी’मध्ये मल्लिका जानची भूमिका साकारली आहे. त्यांची भूमिका अद्भुत होती आणि त्यामधून मला वेश्याची भूमिका साकारण्याच्या बारकाव्यांसाठी प्रेरणा मिळाली. मनिषाजींचा अभिनय दमदार व मोहक होता आणि माझा बेगम अनारामध्ये तीच मोहकता व प्रखरता आणण्याचा मनसुबा होता, ज्यामध्ये काही विनोदी ट्विस्ट असतील. अशी बहुआयामी भूमिका साकारताना मला अभिनय माझ्यासाठी किती प्रिय आहे याची जाणीव झाली. फक्त संवाद म्हणणे महत्त्वाचे नाही तर प्रेक्षकांना उत्साह व हास्याचा आनंद देणारे व्यक्तिमत्त्व आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. माझ्या सोशल मीडियावर बेगम अनाराचे काही फोटो पोस्ट केल्यानंतर मला माझ्या चाहत्यांकडून डीएम व कौतुक मिळण्यास सुरूवात झाली, जे उत्साहवर्धक होते. ही भूमिका साकारताना मला आमच्या कलेची विविधता आणि विनोद शैलींपलीकडे जात प्रत्येकाला कशाप्रकारे आनंद देऊ शकते याची जाणीव झाली. अधिक हास्य व सरप्राइजेजसाठी पाहत राहा मालिका ‘भाबीजी घर पर है’.” सुरू असलेल्या एपिसोडबात सांगताना शुभांगी अत्रेम्हणाल्या, “तिवारी (रोहिताश्व गौड) आणि विभुती (आसिफ शेख) यांना सक्सेना (सानंद वर्मा) आपल्याच धुंदीत हरवल्यासारखे लक्षात येते. सक्सेना सांगतो की, त्याचे काका प्रख्यात वैज्ञानिक आहेत आणि त्यांनी लावलेला शोध ‘दुर्बिणी’साठी काही लोक त्यांचा पाठलाग करत आहेत. या दुर्बिणीमधून समांतर विश्व पाहता येऊ शकते. याबाबत काहीशी शंका वाटल्यामुळे तिवारी व विभुती सक्सेनाच्या काकांना भेट देतात आणि दुर्बिणीमधून पाहतात. समांतर विश्वामध्ये, तिवारी नवाब बैलुद्दीन आहे, विभुती काकडी विक्रेता खाचेदुद्दीन आहे, अंगूरी बेगम अनारा आहे आणि अनिता (विदिशा श्रीवास्तव) नर्तिका अंजुमन आहे. तिवारी व विभुती अनिता आणि अंगूरीला याबाबत सांगतात. त्या देखील दुर्बिणीमधून पाहतात. त्यांना समजते की बेगम अनारा उदास व मद्यपी आहे, तर अंजुमन आणि खाचेदुद्दीन विवाहित आहेत, पण कोणालाही त्यांच्या नात्याबाबत माहित नाही. अंजुमन खाचेदुद्दीनला बेगम अनाराला आपल्या प्रेमात पाडण्यास सांगते, ज्यामुळे नवाब बैलुद्दीनची संपत्ती बळकावता येऊ शकेल. ”