no images were found
गर्दी रोखण्यासाठी रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ
दक्षिण रेल्वेने गर्दी रोखण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन तिकीट दर 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल आणि 31 जानेवारी 2023 पर्यंत लागू असेल.
दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागाने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या भाड्यात मोठी वाढ केली आहे. दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, आगामी सणाचा हंगाम लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 10 रुपयांवरुन थेट 20 रुपये करण्यात आली आहे.
दक्षिण रेल्वेने दिलेल्या माहितीत असेही सांगण्यात आले आहे की नवीन दर हा 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल आणि 31 जानेवारी 2023 पर्यंत लागू असेल. म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर 1 फेब्रुवारीपासून केवळ 10 रुपयांच्या जुन्या दराने प्लॅटफॉर्म तिकिटे उपलब्ध होतील. या सणाच्या दिवसांत कमीतकमी लोकांना फलाटावर पाठवण्याचा रेल्वेचा निर्णय असून या निर्णयामुळे गर्दीवर नियंत्रण मिळण्यात रेल्वेला यश येईल, असा दावाही करण्यात आलेला आहे.