
no images were found
निर्यातदारांची कार्यशाळा व निर्यात उत्पादनांचे 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शन
कोल्हापूर : राज्य शासनाच्या उद्योग विभाग व सीडबी यांचे संयुक्त विद्यमाने दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत इंजिनिअरिंग असोसिएशन, उद्यमनगर कोल्हापूर येथे निर्यातदारांची कार्यशाळा व निर्यात उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
केंद्र शासन व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पा अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापारामधील देशाचा सहभाग हा आर्थिक कामगिरीचा महत्वाचा मापदंड आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठया प्रमाणात सहभाग वाढविण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनामार्फत विविध स्तरावर पुढाकार घेण्यात येत आहे. त्यामध्ये वस्त्रोद्योग अभियांत्रिकी, अॅटो काम्पोनेन्ट, कृषी उत्पादन, चर्मोद्योग, आयटी / आयटीएस इ. औद्योगिक क्षेत्रे निर्यात वाढीसाठी अधोरेखित करण्यात आली आहेत.
कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातून निर्यात होणारे तसेच एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गतच्या निर्यात उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील निर्यात अनुषंगिक केंद्र शासन व राज्य शासनाच्या विभागाचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील निर्यात वाढीसाठी उद्योजकांकरिता विविध प्रकारच्या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी या दोन्ही दिवशी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे, महाव्यवस्थापक सतिश शेळके यांनी केले आहे.