Home क्राईम रंका नदीवरील धानोरा पूल कोसळला गुजरातचा संपर्क तुटला

रंका नदीवरील धानोरा पूल कोसळला गुजरातचा संपर्क तुटला

0 second read
0
0
105

no images were found

रंका नदीवरील धानोरा पूल कोसळला गुजरातचा संपर्क तुटला

नंदुरबार : गुजरात आणि महाराष्ट्रला जोडणारा रंका नदीवरील धानोरा पूल आज सकाळी कोसळल्याने महाराष्ट्र आणि गुजरातचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, यावेळी कोणतेही वाहन या पुलावर नसल्यामुळे यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. तर हा पूल ४५ वर्षे जुना असल्याचं सांगण्यात येत आहे.

गुरुवारी सकाळी ९च्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधील संपर्क तुटला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. हा रस्ता दोन राज्यांना जोडणारा महामार्ग असून धानोरा ते इसाईनगर दरम्यान असलेल्या रंका नदीवर हा पूल आहे. तर पुलाची मुदत संपल्याने हा पूल खचला आणि पडल्याची माहिती आहे. तर प्रशासनाने याची दखल घेतली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू कोल्हापूर,: छत्रपती शाहू महाराज …