no images were found
अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने व्याख्यान आणि कविसंमेलन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दिनांक ०१ ऑगस्ट २०२४ रोजी, दु १२.३० वाजता अण्णा भाऊ साठे जीवन आणि साहित्य या विषयावर व प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) डी. टी. शिर्के हे या व्याख्यानमालेचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.
तसेच अध्यासनाच्या वतीने दिनांक ०२ ऑगस्ट २०२४ रोजी, कविता प्रबोधनाची हे कविसंमेलन आयोजित केले असून या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान मा. आबा पाटील, मंगसुळी हे भूषविणार आहेत.या कविसंमेलनात रमजान मुल्ला (नागठाणे), चंद्रशेखर कांबळे (राधानगरी), विनोद कांबळे (तिसंगी) , लता ऐवळे (अंकलखोप), प्रकाश नाईक (सरूड) या नामवंत कवींचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे.