no images were found
पूर ओसणा-या भागामध्ये स्वच्छता व औषध फवारणी करा – के.मंजूलक्ष्मी
कोल्हापूर : पावसाने थोडी उसंत घेतली असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे शहरामध्ये पूर ओसणा-या भागामध्ये स्वच्छता व औषध फवारणी करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या. महापालिकेच्या स्थायी समिती समिती सभागृहात सकाळी 10 वाजता प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पूर परिस्थितीबाबत सर्व अधिका-यांची आढावा बैठक घेतली. यावेळी महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहरात आता पूर हळूहळू ओसरु लागला आहे. त्यामुळे पूराचे पाणी आलेल्या मुख्य रस्त्यांबरोबर नागरी भागात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम व औषध फवारणी करा. वर्कशॉप विभागाने स्वच्छतेसाठी लागणारी सर्व यंत्रणा उपलब्ध करुन दयाव्या. रस्ते व पूर क्षेत्रात फायर फायटरमार्फत स्वच्छता केली जाते. यासाठी प्रत्येक फायर फायटरला स्वतंत्र पाण्याचा टँकर वर्कशॉपने दयावा. तसेच शहरामध्ये स्वच्छतेसाठी शासन स्तरावर, मुंबई, नवी मुंबई व पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अत्याधुनिक यंत्रसामग्री मागणी केली आहे. त्या यंत्रसामुग्रीमार्फत पूरबाधीत क्षेत्रात स्वच्छता, मेन ड्रेनेज लाईन कलीनिंग करा. नवी मुंबईचे सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनरी कर्मचा-यांसह आज दुपारपर्यंत पोहचतणार आहे. या मशिनमार्फत आजची स्वच्छता चालु करा अशा सूचना आरोग्य विभागास दिल्या. त्याचबरोबर शहरातील बरेचशा संस्था कामासाइी जेसीबी डंपर व इतर आवश्यक मशनरी देत आहेत त्याचे वर्कशॉप विभागाने नियोजन करावे. प्रत्येक निवारा केंद्रासाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. ज्या संस्था निवारा केंद्रासाठी जेवण व इतर साहित्य देत आहेत त्याचे व्यवस्थित नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, मुख्य लेखापरिक्षक लिलावती मिसाळ, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उप-शहर अभियंता रमेश कांबळे, आर.के.पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, उप-शहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पाटील, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, आस्थापना अधिक्षक राम काटकर, कामगार अधिकारी तेजस्विनी शिंदे, महिला व बाल कल्याण अधिकारी प्रिती घाटोळे आदी उपस्थित होते.