
no images were found
निवारा केंद्रामध्ये नागरीकांना चांगल्या सुविधा दया – प्रशासक के.मंजूलक्ष्मी
कोल्हापूर ता.27: जिल्ह्यामध्ये सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. पुराच्या पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर महापालिकेच्या निवारा केंद्रात करण्याच्या आले आहे. ज्या ज्या निवारा केंद्रात नागरीकांचे स्थलांतर झाले आहे त्या ठिकाणी सर्वांना चांगली सुविधा दया अशा सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सर्व उप-शहर अभियंता यांना केल्या आहेत. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सकाळी 10 वाजता प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सर्व अधिका-यांची पूर परिस्थितीबाबत आढावा बैठक आयोजीत केली होती. यावेळी महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी बोलताना एकाच निवारा केंद्रात जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवारा केंद्रामध्ये लहान मुलांना दुध दया. ज्या ठिकाणी जनावरे स्थलांतरीत केली आहेत त्या ठिकाणी चा-याची व्यवस्था करावी, काही निवारा केंद्रात टॉयलेट कमी पडत असल्यास जादा मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करा. पूराचे पाणी ओसरु लागलेनंतर तातडीने स्वच्छता व औषध फवारणी करण्याचे आताच नियोजन करा. औषधाचा साठा तपासून घ्या. पूराचे पाणी आलेल्या भागामध्ये बॅराकेटींग करा. शहराला पिण्याचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आजच काळम्मावाडी येथील वीज वाहिनीचे दुरुस्तीचे काम तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना जल अभियंता यांना दिल्या.
त्याचबरोबर गेले आठ दिवस महापालिकेची सर्व यंत्रणा दिवसरात्र युद्धपातळीवर काम करत आहे. शहरामध्ये आज सकाळ पर्यंत पूराचे पाणी आलेल्या भागातील 767 नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये पंचगंगा तालीम येथील डॉ.ग.गो.जाधव हॉल, सिध्दार्थ नगर येथील आंबेडकर शाळा, चित्रदुर्ग मठ, मुस्लीम बोर्डिंग, शाहूपरी येथील तात्याहेब मोहिते विद्यालय, महावीर कॉलेज येथील दादासाहेब मगदूम शाळा, मार्केट यार्ड ऑफिस इमारत, रमणमळा येथील महसूल भवन हॉल, रमणमळा सांस्कृतीक हॉल, बापट कॅम्प येथील संत गोरा कुंभार सोसायटी हॉल, न्य पॅलेस छत्रपती शाहू विद्यालय, कदमवाडी येथील समता हायस्कुल, कपूर वसाहत येथील कै.दिलीप माने हॉल, दसरा चौक जैन बोर्डिंग, जाधववाडी येथील प्रिन्स शिवाजी विद्यालय या ठिकाणी या नागरीकांना स्थलांतरीत केले आहे. या सर्व ठिकाणी नागरिकांना पिण्याचे पाणी व इतर अनुषंगिक व्यवस्था निटनेटकी ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उप-शहर अभियंता रमेश कांबळे, सतिश फप्पे, आर.के.पाटील, महादेव फलारी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पाटील, आस्थापना अधिक्षक राम काटकर आदी उपस्थित होते