no images were found
सोनेरी क्षणांचे सोबती’ वामन हरी पेठे ज्वेलर्स आता कुडाळ येथे !
कुडाळ : दागिने आणि महिलांचे अतूट नाते आहे. यासोबतच येते वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या प्रसिद्ध ब्रँडचे नाव जे “सोनेरी क्षणांचे सोबती” म्हणून ओळखले जाते. वामन हरी पेठे ज्वेलर्सची स्थापना 1909 मध्ये मुंबईत झाली. आज वामन हरी पेठे ज्वेलर्स हा सोने आणि डायमंड ज्वेलरीमध्ये विश्वासार्ह ब्रँड आहे आणि विवेकी आणि सौंदर्याविषयी जागरूक सर्व वयोगटातील ग्राहकांना सेवा देतो. वामन हरी पेठे ज्वेलर्स त्यांच्या अप्रतिम आणि उत्कृष्टपणे तयार केलेल्या सोन्याच्या दागिन्यांसाठी ओळखले जातात.
114 वर्षांची अभिमानास्पद परंपरा जपत वामन हरी पेठे ज्वेलर्स ने त्यांच्या दागिन्यांच्या शोरूम मध्ये अजून एक भर घालत कुडाळ येथे आपल्या 25 व्या शोरूम चे उदघाटन 13 डिसेंबर 2023 रोजी , गाळा नं 1,2 ,3,4 तळमजला , आशीर्वाद एव्हेन्यू , ग्रामीण रुग्णालयासमोर , कुडाळ , जिल्हा सिंधुदुर्ग – 416520 येथे सकाळी 11 वाजता आयोजित केले आहे. फोन नं 02362- 297400/9594922040 वर ग्राहक संपर्क साधू शकतात .
या शोरूम मध्ये सोने , चांदी कलर स्टोन, हिऱ्यांचे दागिने आणि राशीरत्ने अशा पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण आभूषणांचे कलेक्शन असणार आहे. या उद्घाटनाचे निमित्त साधून वामन हरी पेठे ज्वेलर्स सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या लेबर चार्जेसवर 15 % आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या लेबर चार्जेसवर 50 % सूट देणार आहेत. लग्न सराईसाठी खास ऑफर असेल.
वामन हरी पेठे ज्वेलर्स यांचे कनकवली आणि रत्नागिरी येथे पण स्टोअर्स आहेत. या दोन शाखांना प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या दोन्ही स्टोअर्स मधील दागिन्यांचे कलेक्शन ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्स त्यांच्या आयकॉनिक फ्यूजन मालिकेतील “नाविन्या कलेक्शन सुद्धा लोकप्रिय आहे , ज्या कलेक्शन मध्ये ते दरवर्षी एक पारंपरिक महाराष्ट्रीय दागिन्याला आधुनिक ट्विस्ट देऊन सादर करतात .
श्री आशिष पेठे, पार्टनर, वामन हरी पेठे ज्वेलर्स म्हणाले की, वामन हरी पेठे ज्वेलर्स म्हणजे केवळ दागिन्यांमध्येच नव्हे तर त्याच्या व्यवहारांमध्ये शुद्धता, शुद्ध विश्वास, नाविन्यपूर्ण डिझाइन्स, उत्कृष्ट दर्जा, कलाकुसर आणि डिस्प्लेवरील डिझाईन्सचे उत्कृष्ट फिनिशिंग यासाठी ओळखले जातात. वामन हरी पेठे ज्वेलर्स मध्ये आमच्या मूल्यवान ग्राहकांना सर्वोत्तम ग्राहक सेवा आणि ग्राहक अनुभव देण्याचा आम्हाला अभिमान आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्स हे आमच्या ग्राहकांच्या सर्व दागिन्यांच्या गरजांसाठी एक स्टॉप शॉप आहे.
वामन हरी पेठे ज्वेलर्सना नुकतेच डोमेस्टिक जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिलने “भारतातील पसंतीचे विक्रेते ”म्हणून गौरविले आहे आणि रेडिओ सिटीद्वारे अलीकडेच 30 पॉवरलिस्टच्या 30 एलिटिस्ट पॉवर-पॅक्ड बिझनेसच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
सचोटीने वागणे, वस्तू, व्यवहार आणि वर्तनात शुद्धता, हे आमचे ब्रीदवाक्य आहे आणि या संकल्पनेवरच आमची संस्था इतकी वर्षे टिकून आहे. आम्ही 2000 मध्ये टॅग लाइन तयार केली आणि ती जोपासली आणि 2001 मध्ये ती अस्तित्वात आणली. पुढे ते म्हणाले, एखादा ग्राहक जेव्हा आनंदी असतो किंवा काहीतरी साजरे करत असतो तेव्हा आमच्याकडे येतो. आणि आम्ही भाग्यवान आहोत कि आमच्याकडे आनंदी ग्राहक येतात. आमचं प्रॉडक्ट असे आहे कि, जेंव्हा प्रत्येक ग्राहकाच्या आयष्यात सोनेरी क्षण येतात जसे लग्न, वाढदिवस, अनिव्हर्सरी, तेंव्हा त्या दिवसाच्या आठवणची एक आठवण म्हणून तो आमच्याकडून एक दागिना विकत घेतो, पण तेंव्हा आम्ही त्याला वस्तू म्हणून विकत नाही तर, आम्ही त्यांच्या प्रत्येक सोनेरी क्षणाचे साथीदार असतो. आणि हीच आमच्या टॅगलाइन मागची धारणा आहे आणि त्याचा खरा अर्थ आहे.
वामन हरी पेठे ज्वेलर्स हे आश्चर्यकारक नवीनतम डिझाईन्स आणि सर्वोत्तम किमतींसाठी एक खात्रीचे ठिकाण आहे. परंपरा आणि आधुनिकतेचे परिपूर्ण मिश्रण असलेले वामन हरी पेठे ज्वेलर्स नवीन क्षितिजे गाठण्यासाठी सज्ज झाले आहेत.