no images were found
कणेरी मठ येथे आंतरक्षेत्रीय कार्यशाळा उत्साहात
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-भा.कृ.अनु.प. अटारी बेंगलुरू, अटारी पुणे व श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 20 जुलै रोजी किसान समृद्धी ॲपच्या वापराबाबत आंतक्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प.पू. अदृश काडसिद्धेश्वर स्वामीजी, चेअरमन, श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी, डॉ. सी वेंकट सुब्रमण्यम, डायरेक्टर अटारी बेंगलुरु, डॉ. एस. के. रॉय, डायरेक्टर अटारी पुणे, डॉ. शाकीर अली, प्रिन्सिपल सायंटिस्ट अटारी पुणे, डॉ.डी.कोळेकर, सायंटिस्ट अटारी बेंगलुरू, तसेच अटारी पुणे व आटारी बेंगलुरू झोन मधील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाघाटन परम पूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या उपस्थितीत झाले. स्वामीजींनी आपल्या उद्घाघाटनपर प्रबोधनांमध्ये किसान समृद्धी ॲप शेतकरी, कृषी विज्ञान केंद्र,व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी तयार केलेल्या उत्पादनासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे व याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले. डॉ. ही व्यंकट सुब्रमण्यम, यांनी कृषी विज्ञान केंद्रांचे शेतकऱ्यांसाठीच कार्य, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेला बदल, जिल्ह्याच्या अर्थकारणात, राज्याच्या अर्थकारणात तसेच राष्ट्राच्या अर्थकारणात झालेल्या बदलाबद्दल सविस्तर माहिती दिली व कृषी समृद्धी ॲप शेतकऱ्यांसाठी कसे वरदान ठरणार आहे याविषयी सांगितले. डॉ एस के रॉय, यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनीचे उत्पादने या प्लॅटफॉर्म वरती जोडले जातील व शेतकऱ्यांना एक चांगला ऑनलाईन मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म मिळेल याची ग्वाही दिली. डॉ. सी. पी. रॉबर्ट, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, पथानामथिट्टा, यांनी किसान समृद्धी या ॲप बद्दल उपस्थिताना सविस्तर प्रेझेंटेशन द्वारे माहिती दिली, तसेच त्यांच्या मनातील शंका व प्रश्नांना उत्तरे दिले. या किसान समृद्धी ॲप द्वारे शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादक कंपनीना व कृषी विज्ञान केंद्रांना त्यांच्या उत्पादनाची जाहिरात व ऑनलाइन विक्री करता येणार आहे. या कार्यशाळेमध्ये श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रा मार्फत राबवण्यात आलेल्या समूह प्रात्यक्षिक व सोयाबीन बिज उत्पादन मॉडेल गावच्या लाभार्थींना मृदा आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले.
तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या विविध प्रकल्पांना व प्रक्षेत्रास सर्व उपस्थितंसाहित भेट देऊन माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र वावरे, विषयी विशेषज्ञ, मृदा शास्त्र यांनी केले व डॉ रवींद्र सिंग, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, कणेरी यांनी आभार व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रतील, श्री पांडुरंग काळे (विषयी विशेषज्ञ, कृषिविद्या), डॉ. पराग तुरखडे (विषयी विशेषज्ञ, पीक संरक्षण), प्रतिभा ठोंबरे (विषयी विशेषज्ञ, गृहविज्ञान), डॉ. सुनील कुमार (विषयी विशेषज्ञ, कृषिविस्तार), व डॉ, पुष्पानाथ चौगुले (विषयी विशेषज्ञ, पशुविज्ञान), सहभागी झाले होते.