Home सामाजिक ‘जोपर्यंत तोडगा निघणार नाही, तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टी

‘जोपर्यंत तोडगा निघणार नाही, तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टी

1 second read
0
0
29

no images were found

‘जोपर्यंत तोडगा निघणार नाही, तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टी

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असणाऱ्या दूधगंगा नदीच्या पुलावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर आणि ट्रकच्या आडवे झोपत रोखून धरले. काही वेळातच त्या ठिकाणी कारखाना समर्थकांनी मोठी गर्दी केली. कार्यकर्ते आणि समर्थकांच्यात जोरदार वादावादी झाली. तब्बल दोन तासांहून अधिक काळ हा प्रकार सुरू होता. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.पोलिसांनी हस्तक्षेप करत आडवे झोपलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करत वाहने कारखान्याच्या दिशेने रवाना केली.
कर्नाटक राज्यातील सदलगा येथून घोसरवाड-दत्तवाडमार्गे उसाचे ट्रॅक्टर येत असल्याची माहिती संघटना व आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना मिळताच टाकळीवाडी हद्दीत हे ट्रॅक्टर अडवून टायर फोडून रोखून धरले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना शांत केले. रात्री उशिरा कारखाना समर्थकांनी ट्रॅक्टर दुरुस्त करून कारखान्याकडे घेऊन गेले.
चालू गळीत हंगामातील ऊसदर व मागील गळीत हंगामातील ऊसाला प्रतिटन ४०० रुपये द्यावेत तसेच ऊस वजन काटे डिजिटल करावेत, या प्रमुख मागण्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर ऊसतोड बंद आंदोलन सुरु ठेवले आहे. तरीही या आंदोलनाकडे दुर्लक्ष करुन ओलम (हेमरस) शुगर्सने कर्नाटकातील ऊस आणून कारखाना सुरु करण्याचा सुरु असलेला प्रयत्न तत्काळ थांबवावा, अशी मागणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ओलम (हेमरस) कारखान्याकडे करण्यात आली. संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्याण्णावर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी राजगोळी ते कारखान्यापर्यंत चालत जाऊन निवेदन दिले. निवेदन स्वीकारुन कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…