no images were found
जाणीव व स्नेहसंगीतप्रतिज्ञा चे काम सर्वांसाठी आदर्शवत : प्रसाद देशपांडे
कोल्हापूर(प्रतिनिधी) : समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या जाणीव फाउंडेशन आणि स्नेह संगीत प्रतिज्ञा या रोजच होणाऱ्या गीत मैफिलींच्या उपक्रमातून, विविध आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आधार देणाऱ्या प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचं काम सर्वांसाठी आदर्शवत असल्याचं प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव प्रसाद देशपांडे यांनी केलं.
जाणीव फॉउंडेशन आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था आणि माऊली सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं शाहू स्मारक येथे आयोजित करण्यात आलेल्या एच.आय.व्ही बाधित शालेय मुला – मुलींना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. शंभरहून अधिक मुला मुलींना हे साहित्य वाटप करण्यात आलं.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जाणीव फॉउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सुषमा बटकडली यांनी, संस्थेच्या आजवरच्या कार्याला उजाळा दिला. संस्थेला शासकीय कोणतेही अनुदान नाही. २०११ पासून संस्था लोकवर्गणीच्या माध्यमातून समाजातील एच.आय. व्ही बाधितांसाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव प्रसाद देशपांडे यांनी, वंचित आणि दुर्लक्षित घटकांकडे समाजानं लक्ष देण्याची आणि त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढं करण्याची गरज व्यक्त केली.
आपल्या स्तरावर अशा घटकांसाठी जी मदत लागेल ती देऊ असं आश्वासन देशपांडे यांनी यावेळी दिलं. देशपांडे यांनी, इतक्या मोठ्या संकटाशी झुंझ देणाऱ्या या सर्व मुलामुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटत असल्याचं सांगितलं. भविष्यात या विद्यार्थांना जे लागेल ती मदत देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर मान्यवरांच्या हस्ते एचआयव्ही बाधित शालेय मुल – मुलींना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यामध्ये बॅग, वह्या, कंपास, पिण्याच्या पाण्याची बॉटल आदीचा समावेश होता. शंभरहून अधिक मुलामुलींना या साहित्याचं वाटप करण्यात आलं.
यासाठी इंडोको कंपनी, आशिष तुरकीया, समीर दैनी यांचं सहकार्य लाभलं. यावेळी बसव केंद्र आणि कोल्हापूर लिंगायत समाजाचे पदाधीकारी चंद्रकांत बटकडली, रघुनाथ पाटील, माधव बोरगावकर हे उपस्थित होते. प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे व स्नेह संगीत प्रतिज्ञा चे प्रशांत जोशी यांनी संयोजन केले, तर, पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले.