Home शैक्षणिक इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीकडून प्रा. एस.आर. यादव यांची मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड

इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीकडून प्रा. एस.आर. यादव यांची मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड

4 second read
0
0
23

no images were found

इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीकडून प्रा. एस.आर. यादव यांची मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड

 

 

कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. एस.आर. यादव यांची इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमी (इन्सा) या प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेकडून मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल विद्यापीठ कार्यालयात त्यांचे ग्रंथभेट देऊन अभिनंदन केले.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. यादव यांनी वनस्पतीशास्त्रामध्ये जागतिक दर्जाचे संशोधन करून शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक उंचावला आहे. सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी आपल्या संशोधन कार्यात खंड पडू दिलेला नाही, ही सर्वच क्षेत्रांतील संशोधकांसाठी आदर्शवत बाब आहे. त्यांच्या या निवडीचा विद्यापीठास नितांत अभिमान आहे.

डॉ. यादव म्हणाले, आजवर मी जे थोडेफार संशोधन करू शकलो आहे, त्यामध्ये शिवाजी विद्यापीठ या माझ्या मातृसंस्थेचा मोलाचा वाटा आहे. भावी काळातही वनस्पतीशास्त्रातील संशोधन अव्याहत करीत राहण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि वनस्पतीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजाराम गुरव उपस्थित होते.

डॉ. यादव हे सध्या विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात इन्सा वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर आता ‘इन्सा’कडून त्यांची मानद शास्त्रज्ञ म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. पुढे आणखी दोन वर्षे मुदतवाढही मिळू शकते. हा सन्मान प्राप्त करणारे विद्यापीठातील ते पहिले शास्त्रज्ञ आहेत. या अंतर्गत त्यांना संशोधनविषयक बाबींसाठी एक लाख रुपयांचे अनुदानही प्राप्त होणार आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयातर्फे देण्यात येणारा ‘इ.के. जानकी अम्मल जीवन गौरव पुरस्कार’ हा संशोधनातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार वनस्पतीशास्त्रातील संशोधनातील योगदानासाठी त्यांना सन २०१८मध्ये प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळविणारे डॉ. यादव हे राज्यातील एकमेव संशोधक आहेत. आता इन्साकडून मानद शास्त्रज्ञ म्हणून निवड होणे, हा त्यांच्या संशोधकीय कारकीर्दीचा गौरवच आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…