Home शासकीय धोकादायक इमारतींवर कारवाई करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

धोकादायक इमारतींवर कारवाई करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

44 second read
0
0
39

no images were found

धोकादायक इमारतींवर कारवाई करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

 

कोल्हापूर  : पंचगंगा नदीची पाणी पातळी सतत वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीच्या पाश्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या तयारीचा आढावा सोमवारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घेतला. यावेळी धोकादायक इमारतीवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासकांनी सर्व उपशहर अभियंता यांना दिल्या. तसेच उद्यान विभागाने धोकादायक झाडांची यादीची ट्री कमिटीची मान्यता घेऊन अशा धोकदायक झाडांच्या फांदया लवकरात लवकर छाटणीच्या सूचना दिल्या. हि आढावा बैठक महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात सकाळी घेण्यात आली.

            प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी उप-शहर अभियंता यांनी स्थलांतरीतांच्या निवा-याची, त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधेची पडताळणी करा. विभागीय कार्यालय क्षेत्रातील धोकादायक इमारतींची आज पुन्हा पाहणी करुन इमारतींचा धोकादाय भाग उतरून घेण्याच्या सूचना सर्व उप-शहर अभियंता यांना दिल्या. संभाव्य पूर परिस्थितीच्या कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आपले फोन सुरु ठेवावेत. पुढील दोन महिने परवानगी न घेता कोणीही रजेवर जाऊ नये. रजेवर जायाचे झालेस पूर्व परवानगी घेऊनच रजेवर जाणेच्या सूचना दिल्या. आरोग्य विभागाने औषधाचा पूरेसा साठा करुन ठेवावा, डेंग्युच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्‍ यंत्रणेने सर्व्हे वाढविण्याच्या सूचना आरोग्याधिकारी यांना दिल्या. वर्कशॉप विभागाने सर्व वाहनावर तीन शिफ्टमध्ये ड्रायव्हरांची डयुटी लावून रात्रीच्यावेळीही सर्व यंत्रणा सज्य ठेवण्याचे आदेश त्यांनी सहा.आयुक्तांना दिले. अग्निशमन विभागाने त्यांच्याकडील सर्व साधन सामुग्री सज्ज ठेवावी. या विभागास रात्रीच्यावेळी पडलेली झाडे उचलण्यासाठी स्वतंत्र जेसीबी व डंपर देण्याच्या सचूना वर्कशॉप विभाग प्रमुखांना दिल्या. शहरात जी बांधकामे सुरु आहेत त्यांची खरमाती, वाळू व इतर साहित्‍य रस्त्यावर पडले असते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे अशा बांधकामांवर दंडात्मक कारवाई करावी. यासाठी नगरचना, विभागीय कार्यालय व आरोग्य विभागाने समन्वय ठेऊन कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

            यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, संजय सरनाईक, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता सतीश फप्पे, आर.के.पाटील, रमेश कांबळे, महादेव फुलारी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, इस्टेट ऑफिसर विलास साळोंखे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, वर्कशॉप प्रमुख विजयसिंह दाभाडे, सहा.अभियंता अमित दळवी, नोडल ऑफिसर डॉ.अमोल माने आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो”-आन तिवारी

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आ…