
no images were found
वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना पथकरातून सुट देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून पास घेण्याचे आवाहन
कोल्हापूर : शासन परिपत्रकात निर्देशित केल्याप्रमाणे दि.4 जुलै ते 21 जुलै 2024 या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथकरातून सुट देण्यासाठी निर्देश प्राप्त झाले आहेत. वाहनांना पथकरातून सूट मिळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात पास देण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. सर्व भाविकांनी पथकरातून सुट मिळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातुन सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत हजर राहुन पास जारी करुन घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केले आहे.