Home शासकीय कलिना संकुलामधील सोयी-सुविधांच्या पाहणीसाठी विधिमंडळ सदस्यांची समिती –  चंद्रकांत पाटील

कलिना संकुलामधील सोयी-सुविधांच्या पाहणीसाठी विधिमंडळ सदस्यांची समिती –  चंद्रकांत पाटील

32 second read
0
0
22

no images were found

कलिना संकुलामधील सोयी-सुविधांच्या पाहणीसाठी विधिमंडळ सदस्यांची समिती  चंद्रकांत पाटील

 

            मुंबई मुंबई विद्यापीठ हे जगातील मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे. या विद्यापीठाचा जगात नावलौकिक आहे. विद्यापीठाचे कलिना संकुलामध्ये मुलींसाठी वसतिगृह आहे. या वसतिगृहातील सुविधांबाबत विद्यार्थिनीच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर संपूर्ण कॅम्पस मधील सोयीसुविधास्वच्छता तसेच वसतिगृहातील सुविधा याबाबतची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती कॅम्पसला भेट देवून येथील सुविधांची पाहणी करेलअसे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत आज सांगितले.

            याबाबत सदस्य ॲड. पराग अळवणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारआशिष शेलारअसलम शेख यांनी भाग घेतला.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, अनेक विद्यापीठ आता स्वायत्त आहेत. विद्यापीठ प्रशासनत्यांच्या व्यवस्थापनावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल. कलिना संकुल परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडे तीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. याबाबत प्रस्तावाचे सादरीकरण घेवून योग्य प्रस्तावाची निवड करण्यात येईल. त्याद्वारे  या परिसराचा विकास करण्यात येईलअसेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

Load More Related Articles

Check Also

भाजपा कोल्हापूर महानगर मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर…

भाजपा कोल्हापूर महानगर मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर…   कोल्हापूर (प्रतिनिधी):…