Home आरोग्य धर्मांतर रोखण्याचा आदर्श धर्मवीर संभाजी राजे यांनी हिंदूंपुढे ठेवला आहे ! – सद्गुरु बाळ महाराज

धर्मांतर रोखण्याचा आदर्श धर्मवीर संभाजी राजे यांनी हिंदूंपुढे ठेवला आहे ! – सद्गुरु बाळ महाराज

1 min read
0
0
24

no images were found

धर्मांतर रोखण्याचा आदर्श धर्मवीर संभाजी राजे यांनी हिंदूंपुढे ठेवला आहे ! – सद्गुरु बाळ महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे हिंदु धर्म टिकून आहे, तर धर्मवीर संभाजी महाराज यांच्यामुळे हिंदूंचे अस्तित्व टिकून आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज नसते, तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात इस्लामीकरणाचा प्रभाव निर्माण झाला असता. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की, धर्मसंस्थापनेसाठी मी पुन:पुन्हा अवतार घेतो. ज्याप्रमाणे रावणाचा वध श्रीरामाने, कंसाचा वध श्रीकृष्णाने वध केला, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला जेरिस आणले. धर्मवीर संभाजी महाराज यांनी हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्तांवर जरब बसवली. ‘हिंदूंचे धर्मांतर केले, तर पोर्तुगालचे हिंदूकरण करू’, अशी चेतावणी दिली. हिंदूंचे धर्मांतर कसे रोखायचे ? याचा धर्मवीर संभाजी महाराज यांनी हिंदूंना आदर्श घालून दिला आहे. आपल्याला भारताला हिंदु राष्ट्र करायचे आहे, हा विचार आपल्या हृदयामध्ये दृढ करावा, असे उद़्‍गार सद्गुरु बाळ महाराज, यांनी काढले. ते वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात बोलत होते.

‘हेट स्‍पीच’ नावाने केवळ हिंदुत्‍वनिष्‍ठ नेत्‍यांचे दमन
द्वेषमुलक वक्‍तव्‍य (हेट स्‍पीच) विषयी बोलतांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य तथा मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता सुरेश कुलकर्णी म्‍हणाले, ‘‘द्वेषमुलक वक्‍तव्‍य केल्‍याने कायदा आणि सुव्‍यवस्‍थेला बाधा पोचते, हे कारण देऊन प्रशासनाकडून हिंदुत्‍वनिष्‍ठ नेत्‍यांचे दमन केले जाते. महाराष्‍ट्रातील चोपडा येथे तेलंगाणा येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ आमदार राजा सिंह यांची सभा आयोजित करण्‍यात आली होती. यासाठी १ मासापासून कार्यकर्ते सिद्धता करत होते; पण प्रशासनाने सभेच्‍या आधल्‍या दिवशी अनुमती नाकारली. याप्रकरणी उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठात याचिका करण्‍यात आली. त्‍यावर सुनावणी होऊन नंतर न्‍यायालयाने सभेची अनुमती नाकारणारा आदेश रहित केला. त्‍यानंतर सभेच्‍या २४ घंट्यापूर्वी प्रशासनाने अनुमती दिली. मीरा भाईंदर येथेही हिंदुत्‍वनिष्‍ठ आमदार श्री. राजा सिंह यांच्‍या सभेलाही दंगलीच्‍या कारणाने अनुमती नाकारली होती. त्‍यासाठीही न्‍यायालयात जावे लागले. त्‍यानंतर न्‍यायालयाच्‍या आदेशाने या सभेला अनुमती मिळाली, असेही त्यांनी सांगितले

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…