Home शासकीय घरफाळा 6 टक्के सवलत योजनेतून  एका दिवसात 1 कोटी 88 लाख जमा

घरफाळा 6 टक्के सवलत योजनेतून  एका दिवसात 1 कोटी 88 लाख जमा

9 second read
0
0
29

no images were found

घरफाळा 6 टक्के सवलत योजनेतून  एका दिवसात 1 कोटी 88 लाख जमा

कोल्हापूर  : महापालिकेच्या घरफाळा विभागाच्या 6 टक्के सवलत योजनेतून शुक्रवारी एका दिवसात 1 कोटी 88 लाख 72 हजार 992 रुपये जमा झाले आहेत. महापालिकेने दि.1 एप्रिल 2024 ते दि.30 जून 2024 अखेर घरफाळ्याच्या चालू मागणीवर 6 टक्के इतकी सवलत दिली आहे. यावर्षी कर आकारणी व वसुली विभागामार्फत सन 2024-25 या कालावधीत घरफाळ्याची 1,61,564 इतकी बिले जनरेट करुन पोस्ट विभागामार्फत मिळकत धारकांच्या पत्त्यावर पाठविली आहेत. या सवलत योजनेमधून दि.1 एप्रिल 2024 ते आज अखेर 56 हजार 262 एवढ्या मिळकतधारकांनी लाभ घेऊन 24 कोटी 76 लाख 34 हजार 927 रुपये इतकी विक्रमी रक्कम भरुन या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या मिळकतधारकांनी या 6 टक्के सवलत योजनेच्या शिल्लक दोन दिवसामध्ये आपली रक्कम भरुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

            या सवलत योजनेसाठी महानगरपालिकेच्या वतीने सुट्टीच्या दिवशीही म्हणजे शनिवारी व रविवार दि.29 व 30 जून 2024 रोजी सकाळी 9:00 ते रात्री 10:00 या कालावधीमध्ये नागरी सुविधा केंद्र सुरु ठेवलेली आहेत. तसेच नागरीकांच्या सोईसाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम व महानगरपालिका संकेत स्थळावरुन सुध्दा ऑनलाईन रक्कम भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…