Home शासकीय भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक लेखा विवरण राज्य शासनाच्या सेवार्थ संकेतस्थळावर उपलब्ध

भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक लेखा विवरण राज्य शासनाच्या सेवार्थ संकेतस्थळावर उपलब्ध

53 second read
0
0
26

no images were found

भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक लेखा विवरण राज्य शासनाच्या सेवार्थ संकेतस्थळावर उपलब्ध

 

            मुबंई  : महालेखापाल कार्यालय (A & E)-I, महाराष्ट्र, मुंबई यांनी लेखा आणि कोषागार संचालकांना सन २०२३-२४ या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी (GPF) लेखा स्लिप प्रदान केल्या आहेत. तसेच त्या राज्य सरकारच्या https://sevaarth.mahakosh.gov.in सेवार्थ संकेतस्थळावर अपलोड केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाचे (GPF) सदस्य २०२३-२४ या वर्षाच्या भविष्य निर्वाह निधीच्या  स्लिप्स पाहण्यासाठी/डाउनलोडिंग/प्रिंटिंगसाठी या संकेतस्थळाचा वापर करु शकतात, असे वरिष्ठ उप महालेखापाल (निधी) महालेखापाल (अ आणि ई)-१, महाराष्ट्र, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

            महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासकीय विभागच्या दि. ११ जून २०२० च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने, भविष्य निर्वाह निधीची विवरणप्रत प्रदान करण्याची प्रथा वर्ष २०१९-२० बंद करण्यात आली आहे.

            खाते स्लिप्समध्ये जर काही विसंगती आढळल्या असतील तर संबंधित आहरण आणि संवितरण अधिकारी यांच्यामार्फत वरिष्ठ उपमहालेखापाल (निधी), महालेखापाल (ए आणि ई) 1, मुंबई यांच्या निदर्शनास आणून देता येतील. तसेच  हरवलेल्या क्रेडीट/डेबिटचे तपशील, जन्मतारीख आणि नियुक्तीची तारीख, स्लिपवर छापली नसल्यास, पडताळणी आणि अद्ययावतीकरणासाठी महालेखापाल (A & E)-1, महाराष्ट्र, मुंबई यांना त्वरित पाठवू शकता. त्याचप्रमाणे सदस्य विसंगतींचे तपशील, नोंदी, असे काही असल्यास इमेलद्वारे agaeMaharashtra1@cag.gov.in वर पाठवू शकतात, असे वरिष्ठ उप महालेखापाल (निधी) महालेखापाल (अ आणि ई)-१, महाराष्ट्र, मुंबई यांनी कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…