
no images were found
उघड्यावर कचरा टाकलेबद्दल 7 नागरिकांवर दंडात्मक कारवाई
कोल्हापूर : घरोघरी कचरा संकलनासाठी महानगरपालिकेने ॲटो टिप्पर वाहने उपलब्ध करुन दिलेली आहेत. तरी देखील काही नागरिक रस्त्यावर इतरत्र कोठेही कचरा टाकत असल्याचे आरोग्य विभागास निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागामार्फत शुक्रवारी उघडयावर कचरा टाकणाऱ्या 7 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हि कारवाई पांजरपोळ, सरनाईक वसाहत, सायबर चौक, टेंबलाई मंदिर चौक या परिसरामध्ये करण्यात आली. यामध्ये मंगेश मराठे, शंकर गोसावी, आकाश चव्हाण, उमेश मराठे, प्रशांत काळे, शितल देसाई व यदकुद्दीन मुजावर अशा 7 नागरिकांवर उघडयावर कचरा टाकलेबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली. या दंडात्मक कारवाई अंतर्गत रु.4,000/- इतका दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई यावेळी आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे, सुशांत कावडे, श्रीराज होळकर व शुभांगी पोवार यांनी केली.
तरी शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरातील दैनंदिन वापरातून निर्माण होणारा कचरा वर्गीकृतपणे करुन आपल्या भागात येणाऱ्या ॲटो टिपर वाहनांकडेच द्यावा. इतरत्र कुठेही कचरा टाकू नये. इतरत्र टाकलेचे महापालिकेस निदर्शनास आल्यास संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्या आहेत.