
no images were found
क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश व कौशल्य चाचणी प्रक्रियेअंतर्गत निवासी व अनिवासी प्रवेशासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
कोल्हापूर : महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अंतर्गत 9 क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश व कौशल्य चाचणी प्रक्रियेअंतर्गत निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर नांव नोंदणीसाठी 5 जुलै अंतिम तारीख असून विभागस्तरावर 8 जुलै सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी 9 जुलै 2024 रोजी असून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर येथे कार्यालयीन वेळत प्रवेश प्रक्रियेसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे-
क्रीडा प्रबोधिनी ठिकाणे -:पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली या ९ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
क्रीडा प्रबोधिनी मधील क्रीडा प्रकार -: ज्युदो, जिम्नॅस्टिक्स्, हॉकी, शुटींग, फूटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चेरी (धनुष्यबाण), हॅन्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सिंग आदी खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी -: राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू त्यांचे वय १९ वर्षा आतील आहे. अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.
सरळ प्रवेशांचे खेळ -: ज्युदो, जिम्नॅस्टिक्स्, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन – अनिवासी, आर्चेरी (धनुष्यबाण), हॅन्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, सायकलिंग, बॉक्सींग आदी खेळ.
खेळनिहाय कौशल्य चाचणी -: राज्यस्तरावर सहभाग खेळाडूंना त्यांचे वय १९ वर्षा आतील आहे अशा खेळाडूंना संबंधीत खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला आहे.
कौशल्य चाचणी खेळ – : हॅण्डबॉल, जलतरण, सायकलिंग, फूटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टीक्स आदी खेळ इ.