no images were found
लोकसभेत ‘पॅलेस्टाईन’च्या विजयाच्या घोषणा देणार्या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा !
‘एम्.आय.एम्.’चे भाग्यनगरचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत ‘लोकसभा सदस्यत्वा’ची शपथ घेतांना ‘जय भीम, जय मीम’, ‘अल्लाहू अकबर’ या घोषणासमवेत ‘जय फिलीस्तिन (पॅलेस्टाईन) अशीही घोषणा दिली. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेतील कोणत्याही सदस्याने अन्य कुणाल्याही देशाला समर्थन देणे अवैध असून यानुसार त्यांचे सदस्यत्व रहित होते. भारतीय संसदेत शपथ घेतांना अन्य देशांशी निष्ठा ठेवणे, हा देशद्रोह आहे, तसेच हा भारताचा अपमान आहे. त्यामुळे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात असदुद्दीन ओवैसी यांचा तीव्र निषेध व्यक्त करून लोकसभेचे सभापती आणि केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री यांच्याकडे असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करण्याची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला. आज ‘जय पॅलेस्टाईन म्हणणारे उद्या ‘जय हमास’ आणि त्याही पुढे जाऊन ‘जय पाकिस्तान’ म्हणण्यासही कमी करणार नाहीत. त्यामुळे ओवैसी यांच्यावर निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात याला सर्व हिंदुत्वनिष्ठांनी समर्थन दिले. याचसमवेत लोकसभेत लोकसभा सदस्यात्वाची शपथ घेतांना भाजप खासदार श्री. छत्रपाल गंगवार यांनी ‘जय हिंदु राष्ट्र, जय भारत’ असा जयघोष केला. ‘या सकारात्मक कृतीचे आम्ही स्वागत करतो’, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले.
साधू-संतांनी त्यांचे आश्रम आणि मठ सोडून आदिवासी क्षेत्रात धर्मप्रसार करावा ! – पू. श्री रामबालक दास महात्यागी महाराज
युगानेयुगे भारतात संत समाजाची मोठी भूमिका राहिली आहे. संत परंपरेने स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. आताही संतांशिवाय हिंदु राष्ट्राची स्थापना अशक्य आहे. आदिवासींना ‘ते हिंदू नाहीत’, असे सांगून हिंदु धर्म, संत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या विरोधात खोटी माहिती देऊन भडकवण्यात येत आहे. त्यामुळे साधु-संतांनी त्यांचे आश्रम आणि मठ सोडून समाजात जाऊन धर्मप्रसार करणे आवश्यक आहे. असे केल्यास धर्म आणि संत यांच्या विरोधात होणार्या अपप्रचाराला पायबंद बसेल, तसेच नवीन पिढीवर संस्कार होईल, असे प्रतिपादन छत्तीसगड येथील जामडी पाटेश्वरधाम सेवा संस्थानचे संचालक पू. श्री रामबालक दास महात्यागी महाराज केले.
‘हिंदुत्वाच्या कार्यात युवकांचा सहभाग’ यावर मार्गदर्शन करतांना कर्नाटक येथील युवा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष चक्रवर्ती सुलीबेले म्हणाले, ‘‘युवकांचा धर्मकार्यात सहभाग वाढण्यासाठी नदी, तसेच मंदिरांच्या जवळचे तलाव यांची स्वच्छता करणे असे उपक्रम आम्ही घेतले. मंदिरांच्या स्वच्छतेद्वारे अनेक नवीन युवक धर्मकार्याशी जोडले गेले.
या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.