
no images were found
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या स्वतंत्र कार्यालयाचे – हसन मुश्रीफ
कोल्हापूर : सामाजिक न्याय दिनी कोल्हापूर मध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरु होत आहे, हा छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीचा अभिमान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी, अमोल येडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले, सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सुनिता नेर्लीकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे निरिक्षक दत्तात्रय पाटील, सतीश सुतार, बाबासाहेब वडगावकर तसेच विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हे कार्यालय शासकीय निवासस्थान परिसर, विचारे माळ, कोल्हापूर या ठिकाणी सुरू झाले आहे.