Home देश-विदेश जपानच्या पंतप्रधानांवर आज अंत्यसंस्कार

जपानच्या पंतप्रधानांवर आज अंत्यसंस्कार

0 second read
0
0
63

no images were found

जपानच्या पंतप्रधानांवर आज अंत्यसंस्कार
टोकिओ : भर सभेत झालेल्या गोळीबारामुळे मृत्यूमुखी पडलेले जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी टोक्यो इथं दाखल झाले आहेत. शिंजो आबे यांच्या मृत्यूनंतर जवळपास तीन महिन्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार का होणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्याविषयी जाणून घ्या.
जपानमधल्या आगामी निवडणुकीसाठी प्रचार करत असताना जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर ८ जुलै २०२२ रोजी गोळीबार झाला. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर १५ जुलै रोजी अंत्यसंस्कार पार पडले. आता जवळपास तीन महिन्यांनंतर त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. या अंत्यसंस्कारांसाठी पंतप्रधान मोदींसह विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होणार आहेत. राजकीय प्रोटोकॉलप्रमाणे हे अंत्यसंस्कार होणार आहेत.
१९९३ मध्ये वडिलांच्या निधनानंतर शिंजो आबे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना सर्वाधिक मतं मिळाली आणि शिंजो आबे यांची लोकप्रियता वाढत गेली. वयाच्या ५२ व्या वर्षी ते जपानचे पंतप्रधान झाले. जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे.शिंजो आबे सर्वाधिक काळ जपानचे पंतप्रधान राहिलेले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In देश-विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…