
no images were found
केशवराव भोसले नाट्यगृहात छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर संपन्न
कोल्हापूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी केशवराव भोसले नाट्यगृह, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांच्या हस्ते झाले. मेळाव्यास संस्थेचे प्राचार्य महेश आवटे, उपप्राचार्य व्ही. जे. नार्वेकर तसेच ७०० उमेदवार व पालक उपस्थित होते.
मेळाव्यामध्ये उन्मती फाऊंडेशनचे अभिनंदन अंबपकर यांनी नोकरीसाठी उमेदवारांनी प्रोफाईल कसे तयार करावे याचे मार्गदर्शन केले. डॉ. अजय मस्के यांनी व्यक्तिमत्व विकास व रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक शितल माळी यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध उद्योगांसाठीच्या कर्ज योजनांची माहिती दिली. तसेच शंकर नाईक यांनी कलमापन चाचणीबाबत मार्गदर्शन केले