no images were found
सैनिकी वसतिगृहामध्ये कंत्राटी पध्दतीने विविध पदांची भरती
कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांच्या अखत्यारित असलेल्या सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृह, कोल्हापूर आणि सैनिकी मुलांचे वसतिगृह, पन्हाळा येथे अशासकीय पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी कळविले आहे
ही पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर आहेत. माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी त्यांचे पाल्य यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुकांनी अर्जासोबत आधार कार्ड, कामाच्या अनुभव व कोर्स केल्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जामध्ये मोबाईल नंबर नमुद करणे आवश्यक आहे. अर्ज दिनांक 02 जुलै 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे जमा करावेत. प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र उमेंदवारांच्या मुलाखती गुरुवार दिनांक 04 जुलै 2024 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दुपारी 12 वाजता घेण्यात येणार आहेत. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांना राहतील. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
सैनिकी मुलांचे वसतिगृह, कोल्हापूर येथे पुढील पदांची भरती करण्यात येणार आहे. पदाचे नाव, पदांची संख्या व एकत्रितमानधन याप्रमाणे- वसतिगृह अधिक्षक 1 पद (पुरुष), 31 हजार 365, वसतिगृह सहा.अधिक्षक 02 (पुरुष) 24 हजार 477, स्वयंपाकी 05 (महिला) 13 हजार 924, सफाई कर्मचारी 01 (पुरुष) 13 हजार 89, पहारेकरी 01 (पुरुष) 20 हजार 886 या पदांची भरती करण्यात येणार आहे
सैनिकी मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर येथे पुढील पदांची भरती करण्यात येणार आहे. पदाचे नाव, पदांची संख्या व एकत्रितमानधन याप्रमाणे- वसतिगृह सहा.अधिक्षका 03 (महिला) 24 हजार 477, स्वयंपाकी 06 (महिला) 13 हजार 924, सफाई कर्मचारी 01 (महिला) 13 हजार 89, माळी 01 (महिला/ पुरुष) 13 हजार 89 या पदांची भरती करण्यात येणार आहे.
सैनिकी मुलींचे वसतिगृह, पन्हाळा येथे पुढील पदांची भरती करण्यात येणार आहे. पदाचे नाव, पदांची संख्या व एकत्रितमानधन याप्रमाणे- वसतिगृह अधिक्षक 01 (पुरुष) 31 हजार 365, पहारेकरी 01 (पुरुष) 20 हजार 886 या पदांची भरती करण्यात येणार आहे.