
no images were found
एम.सी.ई.डी. च्यावतीने विविध तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांच्या (एम.सी.ई.डी) वतीने युवक-युवती, महिलांसाठी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एक महिना कालावधीच्या अॅडव्हास ब्युटीपार्लर प्रशिक्षण, टॅली प्राईम विथ जी.एस.टी रिटर्न फायलिंग प्रशिक्षण तसेच कोल्हापूर व गारगोटी इथे सात दिवसीय स्मार्ट किचन कुकिंग प्रशिक्षण, दहा दिवसीय ईमिटेशन ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अभ्यासक्रमानुसार प्रात्यक्षिक प्रशिक्षणा शिवाय उद्योजकता विकास प्रशिक्षण ज्यामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग उभारणी व व्यवस्थापन, विविध कर्ज योजना व कर्ज प्रकरण करण्याबाबत, बँकेचे व्यवहार, प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबतचे मार्गदर्शन तज्ञ व अधिकाऱ्यांमार्फत केले जाणार आहे.
यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करण्याऱ्या प्रमाणपत्र दिले जाणार असून सहभागी प्रशिक्षणार्थीना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ( सीएमइजीपी) योजने अंतर्गत कर्ज प्रकरण करणे बाबत सविस्तर मार्गदर्शनासह ऑनलाईन कर्ज प्रस्ताव सादर करणे बाबत मोफत सहकार्य केले जाणार आहे.
या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यानी एम.सी.ई.डी.चे प्रकल्प अधिकारी प्रवीण कायंदे, उद्योग भवन, महावीर गार्डन समोर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे बाजूला, कोल्हापूर मो.नं. ९४०३०७८७७४ किंवा कार्यक्रम सहयोगी वंदना घाटगे मो.नं. ९५५२७४७६२९ यांच्याशी संपर्क साधावा. गारगोटी येथील कार्यक्रमासाठी मानती स्मार्त द्वारा स्मार्ट बिझनेस वूमन, मारोती गल्ली, गारगोटी येथे संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) चे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले आहे.