
no images were found
नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत
कोल्हापूर : नागरी सेवा पूर्वपरीक्षा २०२५ देण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. जाहिरात , परीक्षेचा अभ्यासक्रम , ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सूचना www.siac.org.in तसेच https://pitckolhapur.org/preias/CET.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज 28 जून 2024 रोजी रात्री १२ पर्यंत भरावा. प्रवेश परीक्षा दिनांक 25 ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत घेण्यात येणार आहे. या संधीचा इच्छुक पात्र उमेदवारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आव्हान या केंद्राचे संचालक डॉ. लता देवाप्पा जाधव यांनी केले आहे.
राज्यातील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर,नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर यांच्यासह यशदा संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र (ACEC),पुणे, PCMC संचलित सावित्रीबाई फुले अकॅडमी, पुणे, अंबरनाथ नगरपालिका संचलित यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र अंबरनाथ व ठाणे महानगरपालिका संचलित चिंतामणराव देशमुख यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र (CDIAC) ठाणे यांच्यामार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षासाठी पूर्णवेळ विनामुल्य प्रशिक्षण दिले जाते.