
no images were found
डीकेटीईच्या १० विद्यार्थ्यांची इटूओपन कंपनीत आठ लाख पॅकेजवरती निवड
इचलकरंजी(प्रतिनिधी) : डीकेटीई ही संस्था अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना उत्तम पॅकेजवरती नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. त्याअंतर्गतच इटूओपन या नामांकित कंपनीने कॅम्पस इंटरव्हयूव आयोजित केला होता. या इंटरव्हयूवमध्ये डीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागातील १० विद्यार्थ्यांची आठ लाख पॅकेजवरती निवड झाली आहे. राहूल भंडारी, रत्नेश पाटील, भक्ती आलासे, अर्सलान फारुक, रोहन भोपळे, दिग्वीजय ढोले, प्रथमेश पाटील, तेजस पुंडपाल, केदार सोलापूरे व आर्या सहस्त्रबुध्दे यांची निवड करण्यात आली.
इटूओपन चे मुख्य कार्यालय अमेरिका टेक्सास येथे असून, ही कंपनी क्लाउड तंत्रज्ञानावर काम करीत असून कपंनी सप्लाय चेन मॅनेजमेंट या डोमेन मध्ये काम करीत आहे त्यांच्या ग्राहकांना क्लाउड बेसड तसेच दूरसंचार, सॉफटवेअर, संगणक प्रणाली, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ही कंपनी सेवा देत आहे.
कॅम्पस इंटरव्हयूव ही आजच्या शैक्षणिक जिवनातील अत्याआवश्यक बाब बनली असून त्यासाठी लागणारी ऍप्टीटयूड टेस्ट तसेच सॉफ्ट स्कील या सर्व बाजूंची डीकेटीईमध्ये योग्य तयारी करुन घेतली. याचाच परिणाम कॅम्पस इंटरव्हयूव मध्ये दिसत असून यावर्षी इटूओपन या आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनीने डीकेटीईच्या १० विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या निवडीमुळे नामांकित कंपन्यामध्ये प्लेसमेंटमध्ये डीकेटीईने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. डीकेटीई मध्येे कॅम्पस इंटरव्हयूवच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. तसेच विद्यार्थ्याच्या कॅम्पस इंटरव्हयूवसाठी सॉफ्टस्कील चाचणी व त्याबद्दलचे मार्गदर्शन आणि टेक्नीकल मुलाखातीसाठीही कॉलेजच्या तज्ञ प्राध्यपकांचे कडून मार्गदर्शन केले जाते. त्याचा चांगला फायदा विद्यार्थ्याना इंटरव्हयूवमध्ये होत आहे.
डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, आमदार व उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, डॉ सौ सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांना शुभेेच्छा दिल्या. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्र. संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख प्रा. डॉ.एस.के. शिरगावे, प्रा. डॉ. डी.व्ही. कोदवडे, प्रा. डॉ. एस.ए.पाटील, टीपीओ प्रा. जी.एस. जोशी यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.