no images were found
ध्रुव तारा’चा निरोप घेताना करण व्ही. ग्रोवर म्हणाला, “सूर्य प्रतापची व्यक्तिरेखा चितारणे कायम लक्षात राहील”
सोनी सबवरील ‘ध्रुव तारा – समय सदी से परे’ ही प्रेम अन् काळाच्या प्रवासाची रोचक कथा आहे. महाराजा सूर्य प्रताप (करण व्ही. ग्रोवर) हे मालिकेचा निरोप घेण्याचा दिवस अखेर आला आहे. कारण की, महावीर (कृष्ण भारद्वाज) वल्लभगडवर पर कब्जा करण्याचा सूड उगवण्यासाठी त्यांची हत्या करणार आहेत. मालिकेतील त्यांचे कथानक स्वाभाविकरीत्या समाप्त होणार असल्याने ध्रुव तारा मालिकेतील सर्व कलाकार मंडळींनी करण यांच्या मालिकेतील शेवटच्या दिवसाचा सोहळा साजरा केला.
चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी सर्व कलाकारांनी एकत्र येत करण यांना निरोप देण्याचा सोहळा साजरा करत केक कापला. या वेळी वातावरण जुन्या आठवणींनी भरून गेले. कारण प्रत्येक जण सेटवर करण यांच्यासोबत घालवलेल्या आठवणी ताज्या करताना दिसत होता. तारा यांनी (रिया शर्मा) सोशल मीडियावर पोस्ट करून करण यांना प्रत्येक क्षण सेटवर आपला साथीदार राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले. करण यांनीही ऑन आणि ऑफ-स्क्रीन चित्रीकरणातील संस्मरणीय क्षणांची झलक दाखवणारी एक आनंददायी रील तयार करून आपले आभार व्यक्त केले. या आपल्या रीलमध्ये त्यांनी आपले सर्व क्रू सदस्य आणि संपूर्ण प्रोडक्शनच्या कालावधीत त्यांनी दिलेल्या अतूट पाठिंबा तसेच समर्पणासाठी धन्यवाद व्यक्त केले.
मालिकेत सूर्य प्रताप यांची भूमिका साकारणारे अभिनेते करण व्ही. ग्रोवर म्हणाले की, “ही माझ्यासाठी शिकण्याची एक अप्रतिम संधी होती. सहकलाकारांनी प्रत्येक क्षण आणखीच रंजक करून टाकला. रिया आणि ईशान यांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच माझे मनापासून स्वागत केले. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि मैत्रीची मी मनापासून प्रशंसा करतो. ही भूमिका साकारणे मी नेहमीच मिस करेन, अन् माझ्या दाढीलाही, जी मी या भूमिकेसाठी वाढवली होती! या मालिकेने मला खूप काही दिले आहे. या अद्भूत प्रवासासाठी मी सर्वांना कृतज्ञ आहे.”