Home शासकीय शहरातील नाले सफाईचे 90 टक्के काम पुर्ण

शहरातील नाले सफाईचे 90 टक्के काम पुर्ण

24 second read
0
0
39

no images were found

शहरातील नाले सफाईचे 90 टक्के काम पुर्ण

 

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात मान्सुपुर्व नालेसफाईचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या नाले सफाईतून आजअखेर 8087 टन गाळ उठाव करण्यात आला. तर नाल्यातून फ्लोटींग मटेरियल, प्लॅस्टिक व तत्सम 150 टन मटेरियल बाहेर काढण्यात आले आहे. याचबरोबर छोटे नाले सफाईसाठी 45 कर्मचा-यांची 2 पथके तयार करण्यात आलेली असून शहरातील मुख्य नाल्याचे पोकलॅण्ड मशीनद्वारे आजअखेर 1636 आयवा गाळ उठाव करण्यात आला. हे काम 2 पोकलँड मशिन, 2 जे.सी.बी., 6 हायवा डंपरद्वारे करण्यात आले आहे. या पोकलँड मशिनद्वारे गाडी अड्डा ते लक्ष्मीपुरी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ते महालक्ष्मीनगर, वर्षानगर ते मनोरा हॉटेल व वाय.पी. पोवार नगर ते हुतात्मा पार्क गार्डन ते ॲस्टर आधार हॉस्पीटल ते राजेंद्रनगर, श्याम सोसायटी नाला व हॉकी स्टेडियम ते रेणूका मंदीर या ठिकाणच्या नाल्यांची स्वच्छता पुर्ण झालेली आहे. तर निकम पार्क ते मोरे मानेनगर, हॉकी स्टेडियम ते रामानंदनगर पूल याठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरु आहे. हि नालेसफाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आज सकाळी सहाय्यक आयुक्त-2 कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांनी रामांनंद नगर येथील नाले सफाई व गाळ उठावाची समक्ष पाहणी केली. यावेळी किटक नाशक अधिकारी स्वप्निल उलपे उपस्थित होते.

            तसेच महापालिकेच्यावतीने आज अखेर मनुष्यबळाद्वारे 81 प्रभागामधील 476 चॅनेल्सची सफाई पुर्ण झालेली आहे.  तर जे.सी.बी मशिनद्वारे 206 पैकी 206  चॅनेल्स सफाई पुर्ण झाले आहे. तसेच मनुष्यबळाद्वारे शहरामधील मुख्य ड्रेनेज लाईन (मॅनहोल) 2200 पैकी 2000 ड्रेनेज लाईनचे सफाईचे काम पुर्ण झाले आहे. ही नाले व चॅनेलची सफाई महालक्ष्मी मंदीर परिसर, शाहूपूरी, नागाळा पार्क, रमनमळा, टाकाळा, सम्राटनगर, नेहरुनगर, दुधाळी परिसर, डवरी वसाहत, सिध्दार्थनगर, तवनापा पाटणे हायस्कुल, देवकर पानंद, यादवनगर, कनाननगर, बाजार गेट, शिपुगडे तालिम, खोल खंडोबा परिसर, जाधववाडी, बावडा पॅव्हेलियन, जवाहरनगर, वर्षानगर, हनुमान मंदीर परिसर, कैलासगड स्वारी, पद्माराजे उद्यान, शुगर मिल, ताराबाई पार्क, चंद्रेश्वर, हॉकी स्टेडियम, मार्केट यार्ड, रमणमळा, शास्त्रीनगर, कॉमर्स कॉलेज, फिरंगाई तालीम, तवनाप्पा पाटणे हायस्कूल, फुलेवाडी रिंगरोड, पांजरपोळ, बलराम कॉलनी, यादवनगर, रामानंदनगर, टाकाळा, तपोवन, टेंबलाईवाडी, मंगेशकर नगर, शिवाजी पार्क, सर्किट हाऊस, सदरबाजार, लक्षतीर्थ वसाहत, लाईन बझार, फुलेवाडी, तटाकडील तालीम, रंकाळा तलाव, विक्रमनगर, राजेंद्रनगर, राजारामपूरी 1 ते 5 वी गल्ली, स्वातंत्र्य सैनिक वसाहत, संभाजीनगर, कदमवाडी, सिध्दाळा गार्डन, साईक्स एक्सटेशन, राजोपाध्येनगर, कसबा बावडा पूर्व, तुळजाभवानी, मुक्तसैनिक वसाहत, साळोखेनगर, कळंबा कारागृह, रायगड कॉलनी, सुर्वेनगर, रुईकर कॉलनी, नाना पाटीलनगर व कनेरकरनगर येथे करण्यात आली आहे. शहरातील उर्वरीत नालेसफाईचे पोकलॅन्डद्वारे काम 10 टक्के राहिले असून हे काम तीन दिवसात पुर्ण करण्याचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…