
no images were found
संगीत व नाट्यशास्त्र विभाग आयोजित नाट्य कार्यशाळेची सांगता
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे दिनांक २९ ते ३१ मे या कालावधीत नाट्य कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. २० पेक्षा अधिक विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. या कार्यशाळेमध्ये कालच्या सत्रामध्ये (दि. ३० मे २०२४) डॉ. राजश्री खटावकर (नाटयकलाकार) यांनी ‘नाटकातील अभिनय’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच श्री. विकास कांबळे (नाट्य लेखक) यांनी ‘नाट्यलेखन विचार’ या विषयी मार्गदर्शन केले. तर आजच्या दिवशी (३१ मे २०२४) नाट्य अभिनेता युवराज केळुसकर यांनी ‘रंगमंच तंत्र’ तर डॉ. संजय तोडकर (प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक) यांनी ‘दिग्दर्शनाची कार्यपद्धती’ यावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक श्री. अनुप जत्राटकर यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. तर संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी सहभागींना नाटक या विषयावर पुस्तके भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. या वेळी श्री. अनुप जत्राटकर यांनी ‘चित्रपट माध्यम आणि रंगभूमी यामधील समन्वय’ या विषयावर कार्यशाळेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या सांगता समयी श्री. युवराज केळुसकर यांनी सर्वांचे आभार मानले.