Home शैक्षणिक डी.वाय.पाटील अभियांत्रिकीला स्वयंचलित कॉर्न पीलरसाठी पेटंट

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीला स्वयंचलित कॉर्न पीलरसाठी पेटंट

1 second read
0
0
36

no images were found

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीला
स्वयंचलित कॉर्न पीलरसाठी पेटंट

 

कोल्हापूर(प्रतिनिधी) : डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वयंचलित कॉर्न पीलरसाठी डिझाइन पेटंट मंजूर झाले आहे. प्रा. डॉ. मनीषा भानुसे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी हे यंत्र संशोधित केले आहे. महाविद्यालयाला मिळालेले हे २७ वे पेटंट आहे.

स्वयंचलित कॉर्न पीलर हे नाविन्यपूर्ण असून खास करून शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकते. प्रा. डॉ. मनीषा भानुसे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थी जिनेन कोल्हापूरकर, शिवदत्त मिरजकर, चिराग नेवारे आणि सुशांत बेंद्रे यांनी हे यंत्र विकसित केले आहे. त्याची कार्यक्षम, वापरकर्ता-अनुकूल डिझाइनमुळे कॉर्न पीलिंग प्रक्रिया सोईस्कर, सुकर, जलद आणि स्वस्त होणार आहे. या उपकरणामुळे मक्याच्या प्रक्रियेतील प्रमुख आव्हानांचे निराकरण होईल. प्रक्रिया खर्चात बचत होऊन उत्पादकता वाढवण्यासाठीही मदत मिळणार आहे.

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय उत्तम अभियांते घडवत असतानाच संशोधवर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांची क्षमता, कल्पनाशक्ती व नव संकल्पना विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच समाजोपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नेहमीच संस्थेकडून पाठबळ दिले जाते. या उपकरणाचा मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगला उपयोग होणार आहे.

या संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील ,उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील , कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ.संतोष कुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, अधिष्ठाता (संशोधन) डॉ.अमरसिंह जाधव व विभाग प्रमुख डॉ.तानाजी मोहिते पाटील यांनी अभिनंदन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह देसाई.

  तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह …