no images were found
डीकेटीईमधील डीप्लोमा व बी.टेक. टेक्स्टाईलच्या नऊ विद्यार्थ्यांची अरविंद कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी (प्रतिनिधी) ः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल मधील डिप्लोमा मधील ७ व बी.टेक.मधील २ अशा टेक्स्टाईल विभागात शिक्षण घेणा-या ९ विद्यार्थ्यांची देशातील नामवंत अरविंद लिमिटेड, अहमदाबाद कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. अरविंद कंपनी ही डीकेटीई संस्थेच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांना प्रत्येकवर्षी कॅम्पस इंटरव्हूव मार्फत निवड करीत आहे.
अरविंद लि. ही वस्त्रोद्योगातील नामवंत कंपनी असून कॉटन शर्टींग, डेनिम, नीट आणि बॉटमवेट (खाकी) फॅब्रिक बनविणारी कंपनी असून सदर कंपनी भारतातील डेनिम निर्मितीतील सर्वात मोठी कंपनी आहे. दरवर्षी ही कंपनी डिकेटीईतील विद्यार्थ्यांच्या कॅम्पस निवडीसाठी भेट देत असते. या कंपनीमार्फत कॅम्पस इंटरव्हयुव आयोजित केला होता त्यामध्ये रिटन टेस्ट, पर्सनल इंटरव्हयू अशा अनेक फे-यांमधून विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमतांची चाचणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेवून त्यांची उत्तम पॅकेजसह निवड करण्यात आली. अरविंद लिमिटेड कंपनीमध्ये विनायक लोहार, ओंकार कोरे, कोमल सावंत, तनिष्क नाईक, तुषार कदम, अदिनाथ पाटील, गोविंद जयराज, आदर्श पाटील, श्रेया सुतार या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
तृतीय वर्ष टेक्स्टाईल विभागातील अनिरुध्द जाधव, यस युगान, भावेश सोगानी, ओंकार घाटगे, दामोदर लठठे, सलोनी पाटील, राहुल सप्पाती, दर्शन शहाणे, साक्षी खोत, भरत पारीख, दर्शन शिंदे, ॠशिकेष उघडे, सिध्दांत हिंगमिरे, रत्नदिप मुधाळे, आरती शिंदे, मांडवी दुबे, पौर्णिमा शिंदे या १७ विद्यार्थ्यांची विद्यावेतनावर इंटरनशिपसाठी निवड झाली आहे. प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांचे कार्यक्षमता व त्यांच्यातील संशोधन वृत्तीची पडताळणी करुण त्यांना थेट पुढीलवर्षी म्हणजेच २०२४-२५ साली नोकरीसाठी घेण्याचे संकेत दिले आहेत.
प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटच्या प्र. संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, टीपीओ प्रा. एस.बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.