no images were found
डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विद्यार्थ्यांचा उर्जा साठवणीसाठी ग्रॅव्हीटी बॅटरी हा प्रकल्प विकसीत
इचलकरंजी (प्रतिनिधी) – येथील डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थी रोशन पाटील, कौशिक पाटील, अक्षता बिरजदार व सचिन पाटील यांनी प्रा. प्राची चौगुले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गुरुत्वाकर्षण आधारित उर्जा संचयन तंत्रज्ञान हा नाविण्यपूर्ण प्रकल्प विकसीत केला आहे. हा प्रकल्प उर्जा साठवणीसाठी दिलासा देणारा असून ही साठवलेली उर्जेचे विदयुत उर्जेत रुपांतर होवून ही विदयुत उर्जा दैनंदिन घरगुती, व्यावसायीक वापरासाठी याचा उपयोग होवू शकतो. याचा फायदा म्हणजे कमी वेळेत मोठया प्रमाणात उर्जा साठवू शकतो तसेच हे स्टोरेजतंत्र प्रदुषणमुक्त, किफायतशीर, दिर्घकाल टिकण्यासाठी आहे.
सध्याच्या परिस्थतीत जीवाश्म इंधनाचे स्त्रोत कमी होत आहेत आणि त्यांच्या ज्वलन उत्पादनांमुळे जागतिक पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे अक्षय उर्जा स्त्रोतांच्या वापराकडे वळणे अपरिहार्य आहे. काही अक्षय उर्जा स्त्रोत जसे की सौर आणि पणन उर्जा हवामानावर अवलंबूण असते आणि त्यामुळे ते अस्थिर आहे. अक्षय उर्जा स्त्रोतांद्वारे निर्माण केलेली उर्जा साठवणे हे एक मोठे अव्हान आहे. ब-याच वर्षापासून उर्जा साठवणीसाठी अनेक उपाय केलेले आहेत उदा. बॅटरी स्टोरेज, कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज, पंप केलेले हायड्रो स्टोरेज, फलायव्हील स्टोरेज इ. परंतू प्रत्येक तंत्राला काही मर्यादा आहेत हाच उपाय शोधण्यासाठी गुरुत्वाकर्षण अधारित उर्जा संचयन तंत्रज्ञान विकसीत केला आहे.
धरण जलविदयुत उर्जेसाठी पाणी साठवते तसे ग्रॅव्हीटी बॅटरी संभाव्य उर्जेच्या स्वरुपात उर्जा साठवूण कार्य करते. शीर्षस्थानी जड वजन किंवा ब्लॉक असलेल्या मोठया टॉवरची रचना केली आहे. हे वजन सौर किंवा पवन उर्जेचा वापर करुन उचलले जाते जेंव्हा अतिरीक्त उर्जा उपलब्ध असते तेंव्हा वजन टॉवरच्या शिर्षस्थानी उचलले जाते. ही उचलण्याची प्रक्रिया बॅटरी चार्ज करण्यासारखी आहे. विजेची सर्वाधिक मागणी असताना अतिरीक्त उर्जेची गरज असते तेंव्हा किंवा जेंव्हा सुर्यप्रकाश किंवा वारा नसतो तेंव्हा वजन हळूहळू खाली केले जाते, वजन खाली येताना जनरेटर चालू केला जातो आणि संभाव्य उर्जेचे विदयुत उर्जेमध्ये रुपांतर होते व ही वीज नंतर दैनंदीन वापरासाठी घेवू शकतो. ग्रॅव्हीटी बॅटरी च्या कार्यक्षमतेची गुरुकिल्ली म्हणजे वजन कोठून सुरू होते आणि ते कोठे संपते यामधील उंचीचा फरक हा उंचीचा फरक जितका जास्त तितकी उर्जा साठवली जाते.
डीकेटीईचा हा प्रकल्प उर्जासंचायनासाठी उपयोगी असून या प्रकल्पाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना सदर प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी प्रभारी संचालिका प्रा.डॉ. सौ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ. आर.एन. पाटील यांचे विषेश सहकार्य लाभले.
फोटो ओळी – डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थ्यांनी उर्जाबचतीसाठी तयार केलेल्या ग्रॅव्हीटी बॅटरी प्रकल्पासोबत मागदर्शक व विद्यार्थी.