no images were found
एल्जी ईजी पीएम ‘परमनंट मॅग्नेट’ ऑइल-ल्युब्रिकेटेड स्क्रू कॉम्प्रेसर्स आघाडीचे जीवनचक्र मूल्य देणार
जागतिक उत्पादन क्षेत्राच्या उत्क्रांत होत असलेल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रगत, कॉम्प्रेस्ड एअर सोल्यूशन देण्याप्रती ईलजीआयची बांधिलकी पुन्हा अधोरेखित एल्जी इक्विपमेंट्स (बीएसई: ५२२०७४ एन एस ई: एल्जी इक्विपमेंट्स) या जगातील आघाडीच्या एअर कॉम्प्रेसर उत्पादकांपैकी एक असलेल्या कंपनीने ईजी पीएम (परमनंट मॅग्नेट) ऑइल-ल्युब्रिकेटेड (तेलाचे वंगण घातलेले) स्क्रू एअर कॉम्प्रेसर्स आणून ईजी मालिका श्रेणी अद्ययावत करत असल्याची घोषणा केली आहे. हे स्क्रू एअर कॉम्प्रेसर्स ११-४५ किलोवॉटमध्ये उपलब्ध आहेत. हे अतिप्रगत ईजी पीएम क्षमतेमध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यासाठी सज्ज आहेत. याशिवाय प्रत्येक ग्राहकाला त्यामुळे वाढीव एफएडी किंवा १६ टक्के मोफत एअर डिलिव्हरीही मिळणार आहेच. ईजी पीएम मालिकेतील उत्पादने श्रेष्ठ कामगिरी व ऊर्जा कार्यक्षमता देण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भारवाहक क्षमतेच्या उत्पादनांना १०० टक्के भार लादलेल्या स्थितीतही हे उत्पादन अद्वितीय जीवनचक्र मूल्य निर्माण करून देऊ शकते. अनेक कॉम्प्रेसर्स क्षमतेच्या ८० टक्के भार असेल तेव्हाच काम करू शकतात.
ऊर्जा वापर कमीत-कमी स्तरावर ठेवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या अनेक बुद्धिमान सुविधा ईजी पीएम मालिका ग्राहकांना देऊ करते आणि परिणामी कोणत्याही उत्पादनाच्या वापराचा पर्यावरणावर होणारा परिणाम आटोक्यात ठेवण्यात मदत करते. उच्च कार्यक्षमता चालक प्रणालीमध्ये स्वत: विकसित केलेल्या अतिकार्यक्षम आयई5+ कायमस्वरूपी चुंबकीय समकालिक मोटरचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ही मोटर खास एल्जी एअरएण्ड्ससाठी तयार करण्यात आली आहे. ९६.५ टक्के आणि ९७.६ टक्के यांदरम्यानची मोटर कार्यक्षमता आयई5* स्तराहून बरीच वर आहे, परिणामी ऊर्जेची कमाल कार्यक्षमता व पर्यावरणावरील किमान परिणाम हे दोन्ही साध्य केले जाते.
थेट जोडलेली ही प्रणाली उपयोजित मोटर व एअरएण्ड वेग देऊ करते, एकाच वेळी कामे होत राहतील आणि त्यात पुरेशी कार्यक्षमता असेल याची निश्चिती करते, परिवर्तनीय वेग उपयोजनांमध्ये हे विशेषत्वाने प्रभावी ठरते. सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या तापमान संवेदकाचा अंतर्भाव असलेली इंटेलिजंट औष्णिक झडप तेलाचे कार्यात्मक तापमान आदर्श राखते, हिवाळ्याच्या काळात उत्पादन अति तापू देत नाही आणि त्यामुळे ऊर्जा कार्यक्षमता सुधारते. न्युरॉन फोर नियंत्रकामुळे कॉम्प्रेसरचे कार्य श्रेष्ठ दर्जाचे व खात्रीशीर ठेवण्यासाठी सर्वसमावेशक सुविधा पुरवली जाते. ७ इंची औद्योगिक-श्रेणीचा टचस्क्रीन इंटरफेस व इंटेलिजंट अल्गोरिदम्सने सुसज्ज असलेला न्युरॉन फोर ऊर्जेच्या वापराचे अनुकूलन करणे, एकंदर कार्यात्मक कार्यक्षमता वाढवणे, सुरक्षित व नियंत्रित कामकाजाची निश्चिती करणे आणि सक्रिय देखभाल सुलभ करणे आदी उद्दिष्टांनी तयार करण्यात आला आहे.
“एल्जीमध्ये आम्ही नेहमीच ‘अधिक चांगल्या’साठी बांधील असतो. त्यामुळे आमच्या उत्पादनांमध्ये सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी, कार्यक्षमता कमाल स्तरावर नेण्यासाठी, जीवनचक्राच्या निम्न खर्चांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांच्या कामकाजामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम कमीत-कमी राखण्यासाठी आम्हाला चालना मिळत राहते,” असे एल्जी इक्विपमेंट्स लिमिटेडच्या आयएसएएएमई व एसईए विभागांचे अध्यक्ष भावेश कारियाम्हणाले. “उत्पादन उद्योगातील व्यापक विभागासाठी तयार करण्यात आलेल्या ईजी पीएम मालिकेची श्रेणी ११ ते ४५ किलोवॉट एवढी आहे. ही उत्पादने वापरल्यास ऊर्जेची बचत होते आणि कार्बन उत्सर्जन लगेचच कमी होते.” नवीन ईजी पीएम श्रेणीतील उत्पादनांसोबत एल्जी चे श्रेष्ठ दर्जाचे वॉरंटी* पॅकेज आहे. त्यात एअरएण्डवर १० वर्षांच्या तर कॉम्प्रेसरच्या अन्य घटकांवर पाच वर्षांच्या वॉरंटीचा समावेश आहे, तर व्हीएफडीवर तीन वर्षांची तसेच इलेक्ट्रिकल व रबरी भागांवर एक वर्षाची वॉरंटी आहे.
“आमच्या विस्तारित वॉरंटीमधून आमच्या उत्पादनांची खात्रीशीरता दिसून येते तसेच ग्राहकांना त्यामुळे थोडी अधिक मन:शांती मिळू शकते,” असेही एल्जी इक्विपमेंट्स लिमिटेडच्या आयएसएएएमई व एसईए विभागांचे अध्यक्ष भावेश कारिया यांनी स्पष्ट केले. “आमच्या संपूर्ण वॉरंटी संरक्षणामुळे तसेच चॅनल पार्टनरांच्या व्यापक जाळ्यामुळे आमच्या ग्राहकांच्या निकट राहण्याची हमी आम्ही देऊ शकतो तसेच सेवेच्या विनंतीला जलद व प्रभावी प्रतिसादही आम्ही देतो. त्यामुळे उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम अपटाइम (प्रतिसाद कालावधी) आम्ही राखू शकतो व जीवनचक्र खर्च कमी करू शकतो.”ईजी पीएम मालिकेबद्दल अधिक तपशिलांसाठी किंवा आमच्या उत्पादनांबद्दल चौकशी करण्यासाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या किंवा सपोर्ट टीमशी संपर्क साधा.