
no images were found
बुद्धिबळात प्राविण्य मिळवून महिलानी जीवनात सक्षम व स्वावलंबी बनावे – शोभा तावडे
कोल्हापूर :- विझार्ड चेस क्लब,राजारामपूरी नववी गल्ली, कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा महिला निवड बुद्धिबळ स्पर्धा आज प्रारंभ झाल्या.चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या व जैन सोशल फोरमने प्रायोजित केलेल्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण पाच फेऱ्यात होणार आहेत.इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, गगनबावडा, पन्हाळा व स्थानिक कोल्हापूरातील नामांकित 21 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर गार्गी च्या संस्थापिका सौ.शोभा तावडे व उद्योजक प्रशांत गांधी यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करुन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, प्रितम घोडके, मनीष मारुलकर,आरती मोदी, अनिश गांधी,उत्कर्ष लोमटे, धीरज वैद्य व किरण शिंदे उपस्थित होते. बुद्धिबळ खेळात प्राविण्य मिळवून महिलानी जीवनात सक्षम व स्वावलंबी बनावे असे शोभा तावडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात व्यक्त केले व महिला बुद्धिबळपटूना प्रोत्साहित केले.
आज झालेल्या दुसऱ्या फेरीनंतर अग्रमानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील,द्वितीय मानांकित जयसिंगपूरची दिशा पाटील,तृतीय मानांकित कोल्हापूरची अरिना मोदी कोल्हापूरची सौदर्या आरवाडे या चौघीजणी दोन गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.चौथी मानांकित नांदणीची संस्कृती सुतार व दहावी मानांकित जयसिंगपूरची सिद्धी कर्वे या दोघीजण दिड गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.