
no images were found
जपानमध्ये होतोय लोकप्रिय’फ्रेंडशिप मॅरेज’ !
बदलत्या काळानुसार नात्याचे स्वरुपही बदलत चाललंय. आजकाल विविध ट्रेंड आपल्याला दिसत आहेत. सध्या लोकांसाठी नात्याची व्याख्या झपाट्याने बदलत आहे. जगभर नात्यांमध्ये दररोज वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रिलेशनशिपमध्ये अनेक प्रकारचे ट्रेंड लोकप्रिय होऊ लागले आहेत. सध्या फ्रेंडशिप मॅरेजचाही असाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. जो सध्या जपानमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. हा विवाहाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये लोक एकमेकांवर प्रेम न करता किंवा शारीरिक संबंध न ठेवता जोडीदार बनत आहेत.
आजकाल जपानमध्ये नवीन प्रकारचे नाते लोकप्रिय होत आहे. येथील तरुणांमध्ये फ्रेंडशिप मॅरेज मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट नुसार, या नवीन प्रकारच्या वैवाहिक संबंधात, लोक एकमेकांवर प्रेम न करता किंवा शारीरिक संबंध न ठेवता प्लॅटोनिक भागीदार बनत आहेत. हा ट्रेंड जपानमध्ये इतका लोकप्रिय झाला आहे की हजारो लोक, किंवा 124 दशलक्ष लोकसंख्येपैकी सुमारे एक टक्के लोक या प्रकारचे रिलेशनशिप निवडत आहेत.-
मैत्री विवाह हे एक अशा प्रकारचे रिलेशन आहे. ज्यामध्ये दोन्ही लोक कायदेशीररित्या जीवनात भागीदार असतात. परंतु प्रेम न करता किंवा एकमेकांशी लैंगिक संबंध न ठेवता जगतात. असे लोक एकत्र किंवा वेगळे राहू शकतात. तसेच, जर त्यांना मुलाचे नियोजन करायचे असेल तर ते कृत्रिम मार्गाने मुलाला जन्म देऊ शकतात. इतकेच नाही तर या नात्यात दोघेही एकमेकांची संमती असेल तोपर्यंत त्यांच्या लग्नाबाहेरील लोकांशी प्रेमसंबंध ठेवण्यासही मोकळीक असते. कलर्स नावाची एजन्सी, जी मैत्री विवाह करून देते, त्यांनी या नवीन ट्रेंडशी संबंधित डेटा शेअर केला आहे. त्यातील आकडेवारीनुसार, मार्च 2015 पासून आतापर्यंत जपानमध्ये जवळपास 500 जणांनी अशा प्रकारे लग्न केले आहे. एससीएमपीच्या म्हणण्यानुसार, एजन्सीने खुलासा केलाय की या जोडप्यांनी स्वत:ची घरे उभारली आहेत, तसेच काहींनी मुलांचे संगोपनही केले आहे.
हे रिलेशन म्हणजे पारंपारिक, रोमँटिक प्रेमविवाह किंवा आपल्या जिवलग मित्राशी लग्न करण्यासारखे नाही, ही एक अशी पद्धत आहे, ज्यामध्ये जोडपे लग्नाच्या आधी भेटतात आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित सर्व गोष्टींवर चर्चा करतात. जसे की एकत्र जेवायचे की नाही, तास घालवायचे किंवा घराची विभागणी कशी करावी, घरातील कामे कशी विभागली जातील यावर सहमती दर्शवतात. अनरोमँटिक वाटत असूनही, या प्रकारच्या नातेसंबंधामुळे सुमारे 80% जोडप्यांना आनंदाने एकत्र राहण्यास मदत झाली आहे, बऱ्याच प्रकरणांमध्ये, काही जोडपी मुलांचे संगोपन देखील करत आहेत, असे एजन्सीने म्हटले आहे.