no images were found
नॅनोसायन्सच्या विद्यार्थ्यांची ऑन जॉब ट्रेनिंगद्वारे पेंटइंडस्ट्रीमध्ये निवड
कोल्हापूर (प्रतिनिधी) :शिवाजी विद्यापीठातील स्कूलऑफ नॅनोसायन्स अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी या अधिविभागा मधील विद्यार्थिनींनी डिग्रीपूर्वीच ऑन जॉबट्रेनिंगद्वारे पेंटइंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळवून यश संपादन केले आहे.कु. प्रतीक्षाशिंदेआणिकु. सुप्रिया चिपरे या दोघी ५ वर्षाचा नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हाइंटी ग्रेटेड प्रोग्रॅमच्या शेवटच्या वर्षातशिकत आहेत. नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी याप्रोग्रॅमच्या आवश्यकतेनुसार शेवटच्या वर्षीकु. प्रतीक्षा आणि कु. सुप्रिया ह्या दोघी औद्योगिक प्रशिक्षणासाठी (industrial training) नाशिक येथील नामवंत हाय-टेकड्यूरा या पेंटकंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी स्टायपेंड घेऊन रुजू झाल्या होत्या. ५वर्षाचा नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हा इंटीग्रेटेड प्रोग्रॅमशिकत असताना बहुविद्याशाखीय (Multidisciplinary) अभ्यास क्रमाचा त्यांना खूप फायदा झाला आणि त्याचीच फलश्रुती म्हणून कंपनीने त्यांचे कौशल्य आणि बुद्धिमत्ता पाहून त्यांना पूर्ण वेळ रुजू केले. कु. प्रतीक्षा, रिसर्च अँड डेव्हलोपमेंट एक्सिकेटीव्ह म्हणून रुजू झाली आहेत कु. सुप्रिया क्वालिटी कंट्रोल हेड म्हणून रुजू झाली आहे. सोबतच त्यांना राहण्याची व प्रवासाची सगळी सोयकंपनी तर्फे केली जात आहे.
आजच्या जगात औद्योगिक प्रशिक्षण आणि संशोधना मधील गरज लक्षात घेऊन नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी या प्रोग्रॅमच्या पाच व्यावर्षात प्रशिक्षण दिले जाते. हे आधुनिक प्रशिक्षण घेऊन विद्यार्थी आजच्या युगात नव्या वाटा शोधतील याची दक्षता या इंटीग्रेटेड कोर्समध्ये घेतली जाते म्हणूनच खूपच कमीवेळात नॅनोसायन्स मधून बाहेर पडणाऱ्या अनेक खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव कामगिरी करून परदेशातही आपले पायरोवले आहे.नवीन राष्टीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP-2020) नेनिर्देशित केलेल्या नियमा नुसार प्रत्येक शैक्षणिक कोर्सेमध्ये औद्योगिक प्रशिक्षणाचा(industrial training) सहभाग आवश्यक आहे. नॅनोसायन्स अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी या अधिविभागाने दूर दृष्टी ठेऊन सुरवाती पासूनच प्रोग्रॅमच्या शेवटच्या वर्षी इंडस्ट्रियल प्रशिक्षण आणि रिसर्च प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. NEP-२०२०मध्ये अभिप्रेत असलेले या विभागाचे यश पाहून मा. मा. कुलगुरू, मा. प्र-कुलगुरूआणिमा. कुल सचिव यांनी समाधान व्यक्त केला.तसेच नॅनोसायन्समधील विद्यार्थ्यांनी भविष्यात अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी असाआशावाद त्यांनीव्यक्त केला.नॅनोसायन्स अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. के. के. शर्मा तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.