no images were found
गीतांजली मिश्रा भेटल्या क्रिकेटर वेंकटेश अय्यरला !
टेलिव्हिजनच्या गजबजलेल्या विश्वात गीतांजली मिश्रा एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील दबंग दुल्हनिया राजेशच्या भूमिकेसाठी लोकप्रिय आहेत. पण, प्रतिभावान अभिनेत्री शूटिंग करत नसताना त्यांच्या आवडत्या छंदामध्ये व्यस्त असतात, तो म्हणजे क्रिकेट खेळणे व पाहणे! खेळाप्रती त्यांचा उत्साह पडद्यावरील त्यांच्या परफॉर्मन्सइतकच चमकदार आहे. स्टेडियममधील स्टॅण्डमधून आवडत्या टीमला पाठिंबा द्यायचा असो, खेळाबाबत उत्साही चर्चा करायची असो किंवा त्यांच्या क्रिकेटप्रेमींच्या ग्रुपसोबत क्रिकेट खेळायचे असो क्रिकेटप्रती त्यांच्या प्रेमाला कोणत्याच सीमा नाहीत. क्रिकेटप्रती या आवडीमुळे त्यांना त्यांचा आवडता क्रिकेटर वेंकटेश अय्यरला भेटण्याची विशेष संधी देखील मिळाली.
क्रिकेटप्रती आवडीबाबत सांगताना गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, ”कलाकार असल्यामुळे माझे जीवन पटकथा, सेट्स व तालीम यामध्ये गुंतलेले आहे, पण या रेटारेटी व गोंधळादरम्यान एक आवड मला खूप आनंद देते, ते म्हणजे क्रिकेट. मनोरंजन क्षेत्राच्या चमक व ग्लॅमर पलीकडे मला क्रिकेट मैदानावर दिलासा व उत्साह मिळतो. क्रिकेट खेळणे हा माझा फक्त छंद नसून त्यामधून मला उत्साहपूर्ण आनंद मिळतो, ज्यामुळे खेळाची सहजता व विनम्रतेशी कनेक्ट होता येते. बॅटने चेंडू मारण्याच आवाज, संघातील खेळाडूंमधील साहचर्य आणि धावांचा पाठलाग किंवा धावांना डिफेण्ड करण्याचा रोमांच यामागे काहीतरी जादुई अनुभव आहे. रविवारी दुपारच्या वेळी मित्रांसोबत क्रिकेट खेळायचे असो किंवा आयोजित केलेल्या सामन्यामध्ये खेळायचे असो मला क्रिकेट खेळताना मिळणारा आनंद अद्वितीय आहे. मी माझ्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळात वेळ काढून माझ्या आवडत्या पास्टटाइमचा आनंद घेते. या खेळामुळे होणारा व्यायाम किंवा स्पर्धा यापेक्षा मला खेळामधून खूप आनंद मिळतो. क्रिकेट मला उत्साहपूर्ण करते, तसेच जीवनात संतुलन राखण्यासह साध्या आनंदाला जोपासण्याची महत्त्वाची आठवण करून देते. म्हणून कॅमेरासमोर अभिनय करायचा असो किंवा क्रिकेट खेळायचे असो दोन्ही विश्वांप्रती माझी अविरत आवड मला समाधान व आनंद देते.” अभिनेत्रीने क्रिकेटप्रती आवडीमुळे क्रिकेटर वेंकटेश अय्यरला दिलेल्या भेटीबाबत देखील सांगितले. त्या म्हणाल्या, ”क्रिेकेट नेहमी मला सरप्राइजेज देते अणि त्यापैकी एक आनंददायी सरप्राइज म्हणजे वेंकटेश अय्यरला दिलेली भेट. मी नेहमी त्याच्या क्रिकेटिंग कौशल्यांची प्रशंसा केली आहे, जे मला प्रत्यक्षात पाहायला मिळाले. गेल्या वर्षी मुंबईतील एका क्रिकेट लीग प्रशिक्षण शिबिरादरम्यान आमची भेट झाली. मला आवडलेली बाब म्हणजे आम्हा दोघांना चहा खूप आवडतो. आम्ही पंचतारांकित रेस्टॉरंटऐवजी रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला. यामधून वेंकटेशचे पाय अजूनही जमिनीवर असण्यासोबत त्याचा विनम्र स्वभाव दिसून आला, ज्याप्रती मी भारावून गेले. मी यशस्वी झाल्यानंतर देखील स्थिर राहणाऱ्या व्यक्तींचे कौतुक करते आणि वेंकटेशमध्ये ते गुण आहेत.”