no images were found
भारताचे इराणसोबत ऐतिहासिक करार
नवी दिल्ली- भारत आणि इराणमध्ये एक महत्त्वाचा करार झाला आहे. या करारानुसार, भारत १० वर्ष इराणचे चाबहार बंदर सांभाळणार आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याची माहिती दिली आहे. चाबहार बंदराचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. या करारामुळे इराण आणि भारताचे राजनैतिक संबंध सुधारण्यास अधिक मदत होणार आहे.
भारत चाबहार बंदर १० वर्षांसाठी डेव्हल आणि ऑपरेट करेल. भारत पहिल्यांदाच परदेशातील एखादे बंदर सांभाळणार आहे असं बोललं जातंय.तसेच, पाकिस्तान आणि चीनच्या ग्वादार बंदराला भारताने चाबहार बंदराने उत्तर दिलं आहे. भारत आणि इराणमधील संबंधांसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं बोललं जात आहे.
चाबहारमध्ये दोन बंदर आहेत. एक शाहिद कलंतरी आणि दुसरा शाहिद बहिश्ती. भारत सध्या शाहिद बहिश्ती बंदर सांभाळत आहे. याआधीपासूनच भारत बंदर सांभाळत आहे, पण तो शॉर्ट टर्म करार होता. त्याला वेळोवेळी रिन्यू करण्याची गरज पडायची. पण, आता इराणसोबत १० वर्षांचा लाँग-टर्म करार झाला आहे. जो भारताच्या दृष्टीने फायद्याचा आहे.
Also read:Iraq War: मध्यपूर्वेत तणाव कायम, इराण समर्थक सैनिकांनी इराकवर केला बॉम्ब हल्ला
भारत आणि इराणमध्ये यासंदर्भात दीर्घकाळापासून चर्चा सुरु होती. पण, काही कारणांमुळे करार मागे पडत होता. दोन्ही देशांमध्ये थोडा तणाव निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, भारत बंदरामध्ये १२ कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. इराण, अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील निर्यात सुरळीत व्हावी यासाठी भारत प्रयत्न करत आहे.
नव्या करारामुळे पाकिस्तानच्या कराची आणि ग्वादार बंदराला बायपास करता येईल. चाबहार बंदराची भौगोलिक स्थिती राजनैतिकदृष्या महत्त्वाची आहे. चाबहार इराणच्या दक्षिण-पूर्व भागात आहे. जवळच पाकिस्तानची सीमा देखील आहे. पाकिस्तानच्या ग्बादार बंदराला भारताचे इराणमधील चाबहार बंदर पर्याय ठरु शकणार आहे.