
no images were found
कोकणातील संगम सिगल बेटफक्त 30 मिनिटांसाठी उघड असतं
नदी शेवटी समुद्रालाच येवून मिळते. कोकणात असचं एक ठिकाण आहे जिथे जिथं नदी आणि समुद्र एकरुप होतात. दिवसभरात फक्त 30 मिनिट येथे जाता येते.
कोकण रेल्वेने कुडाळ स्टेशनला उतरुन येथे जाता येते. मालवण पर्यंत थेट बस देखील आहेत. मालवण येथून बोटीनेच या बेटावर जाता येते. दिवसभरात फक्त 30 मिनिटच येथे फिरता येते. या जमीनीच्या टोकावरुन मंत्रमुग्ध करणारा नजारा पहायला मिळतो. कोकण म्हणजे खरचं स्वर्ग असा अनुभव येथे येतो.
येथे जमिनीचे एक निमुळते टोक समुद्र व नदीच्या मिलनाचा दुवा आहे. देवाबाग समुद्र किनारा सिगल संगमसाठी प्रसिद्ध आहे. नदी आणि समुद्राचा संगम होऊन येथे एक सुंदर बेट तयार झाले आहे. संगम सिगल बेट असे या बेटाचे नाव आहे.
सिंधुदुर्गमधील देवबाग समुद्र मालवणपासून 12 किलोमीटर अंतरावर तर तारकर्लीपासून सहा किलोमीटरवर आहे. कर्ली नदी आणि अरबी समुद्रांचा येथे संगम होतो. यामुळेच देवबाग समुद्र किनाऱ्यावर अद्धभूत नजारा पहायला मिळतो.