no images were found
कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न करणार : श्री. मिलिंद देशपांडे.
कोल्हापूर : नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रेरणेने सुरू असणाऱ्या विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या विविध उपक्रम राबवले जात असतात. याचाच एक भाग म्हणून स्वावलंबी भारत अभियानांतर्गत नव उद्योजकांना मार्गदर्शन उपलब्ध व्हावे याकरिता सेवा वर्धिनी पुणे आणि विद्या प्रबोधिनी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे विद्या प्रबोधिनी, कोल्हापूर या संस्थेत सुरु करण्यात आले आहे. या दोन्ही संस्थेदरम्यानच्या सामंजस्य कराराचा कार्यक्रम आज युनिक सेल्सचे डायरेक्टर श्री. आशिष मेहता यांच्या हस्ते विद्या प्रबोधिनी येथे पार पडला. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध महाविद्यालये, शैक्षणिक संस्था व कौशल्य विकास केंद्र याठिकाणी उद्यमिता प्रोत्साहन आणि उद्योजकता मार्गदर्शन शिबीरे आयोजित केली जाणार आहेत.
याप्रसंगी स्वावलंबी भारत अभियानाचे कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक सीए श्री अनिल चिकोडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री राहुल चिकोडे यांनी नोकरी आणि रोजगार मार्गदर्शन क्षेत्रातील विद्या प्रबोधिनीच्या कामकाजाचा विस्तृत परिचय करून दिला. तसेच स्वावलंबी भारत अभियानामध्ये उद्योजकता विकासासाठी विद्या प्रबोधिनी नेहमीच तत्पर असेल असे आश्वासन दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी उद्योजकेकडे वळणे गरजेचे आहे सर्वांनाच शासकीय नोकरी किंवा चांगल्या ठिकाणी नोकरी मिळणे कठीण असल्यामुळे शिक्षणानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी लगेचच एखाद्या व्यवसाय उद्योजकाकडे वळले तर त्यामध्ये लवकर यश मिळेल व त्यासाठी आवश्यक सर्व ते सहकार्य व मार्गदर्शन विद्या प्रबोधिनी येथे सुरू असणाऱ्या या केंद्रामध्ये केंद्राचे समन्वयक नितीन कामत करतील तरी जिल्ह्यातील ज्यांना व्यवसायासाठी मार्गदर्शन हवे आहे अशांनी विद्या प्रबोधिनी केंद्राशी संपर्क साधावा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री आशिष मेहता यांनी आपल्या उद्यमितेचा प्रवास सर्व उपस्थितितांसोबत प्रस्तुत केला आणि भविष्यामध्ये उद्योजक होण्यासाठी सर्वांना प्रेरणादायक असे भाषण केले. स्वावलंबी भारत अभियानाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत समन्वयक श्री.मिलींद देशपांडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उद्योजक मार्गदर्शन केंद्र कशा पद्धतीने कार्य करेल तसेच प्रत्येक तालुका आणि गावांमध्ये उद्योजक निर्माण करण्यासाठी विद्या प्रबोधिनीची कार्य कसे चालेल तसेच सर्व संघटना आणि शैक्षणिक संस्थांच्या मदतीने उद्योजकता विकासासाठी आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतील याची उपस्थित त्यांना माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री स्वागत परुळेकर यांनी केले.याप्रसंगी या कार्यक्रमासाठी स्वावलंबी भारत अभियानाचे कोल्हापूर जिल्हा महिला समन्वयक सौ. स्नेहल कारंडे, विद्या प्रबोधिनीचे संचालक आणि सीईओ श्री. नितीन कामत, स्वावलंबी भारत अभियानाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला समन्वयक सौ. शैलजाताई सांगळे,पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसमन्वययक श्री हेमंतजी साठे, सेवा वर्धिनीचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक श्री. राजेंद्र पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. सूर्यकिरण वाघ, जिल्हा संघाचालक श्री प्रमोदजी ढोले, शहर संघचालक, श्री केदारजी जोशी, शहर कार्यवाह. बँक ऑफ इंडिया चे चीफ मॅनेजर श्री कैलास चौधरी, तसेच स्वावलंबी भारत अभियानाचे कोल्हापूर जिल्हा मंडळाचे सदस्य,विद्यार्थी , उद्योजक आणि अन्य पदाधिकारी व उद्योगाकडे वळू इच्छिणारे करून तरुणी उपस्थित होते उपस्थित होते.