no images were found
कावळानाका टाकीवर होणार पाणीपुरवठा शुक्रवारी बंद
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील मार्केट यार्ड येथील नवीन उंच टाकीला क्रॉस कनेक्शन करणेचे काम शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी हाती घेणेत येणार आहे. यावेळी कावळानाका उंच टाकीवर अवलंबून असणा-या भागातील पाणी पुरवठा होणा-या नाही. या कावळा नाका टाकीवर अवलंबून असलेल्या भागामध्ये नागरीकांना शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच शनिवार दिनांक 11 मे 2024 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे. यामध्ये कावळानाका टाकीवर अवलंबून असणा-या शाहूपुरी व्यापार पेठ ते चौथी गल्लीपर्यंत, पाच बंगला परिसर, साईक्स एक्सटेन्शन, रुईकर कॉलनी, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, स्टेशन रोड, घोरपडे गल्ली, महावीर गार्डन परिसरपर्यंत, न्यू शाहूपुरी, पाटोळेवाडी, मुक्त सैनिक वसाहत, घोडकेवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, कपूर वसाहत, सह्याद्री सोसायटी, गणेश कॉलनी, आयोध्या कॉलनी इत्यादी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.