no images were found
पाकिस्तानमध्ये महागाईचा उद्रेक, 48 वर्षांचा तोडला रेकॉर्ड
पाकिस्तानमध्ये महागाई दर सर्वात जास्त म्हणजे 27.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाकिस्तानी जनता महागाईने होरपळत असून जीवनावश्यक वस्तूंसह इंधनाचे दरही भडकले आहेत. गव्हाचं पीठ दीडशे रुपये किलोने मिळत आहे, तर पेट्रोलचा दर अडीचशे रुपयांवर पोहोचला.पाकिस्तानकडे पैसेच नसल्यानं फळ आणि भाजीपाल्याने भरलेले 6 हजार कंटेनर कराची बंदरात उभे आहेत. फक्त महिनाभर पुरेल एवढाच खाण्याच्या तेलाचा साठा शिल्लक राहिला आहे. तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरु असून एका डॉलरची किंमत 260 पाकिस्तानी रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने कर्जपुरवठ्यासाठी कडक अटी घातल्या आहेत. वीज आणि इंधन 60 टक्क्यांपर्यंत महाग करण्याच्या अटीमुळे महागाई आणखीनच भडकणार आहे.