
no images were found
मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी, सतर्कतेचा इशारा
मुंबई : सांताक्रूझ येथील एका रहिवाशाला व्हिडिओ कॉल करून एका अज्ञाताने मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली असून याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
सांताक्रूझ येथील एका रहिवाश्याला एका व्यक्तीकडून व्हिडिओ कॉल आला आणि मुंबईला बॉम्बने उडवणार असल्याची धमकी दिली आहे. त्यानंतर या नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
तसेच, याअगोदर अनेकवेळा कॉल करून मुंबई उडवण्याच्या धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तर सामान्य व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून धमकी दिल्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे.