Home सामाजिक एअरबीएनबी ने आणली आयकॉन्स नावाची योजना

एअरबीएनबी ने आणली आयकॉन्स नावाची योजना

2 second read
0
0
37

no images were found

एअरबीएनबी ने आणली आयकॉन्स नावाची योजना

मुंबई- आज एअर बीएनबीने आयकॉन्स नावाची योजना जाहीर केली आहे. यात संगीत, चित्रपट, टेलिव्हिजन, कला, क्रीडा आणि यासारख्या अनेक क्षेत्रातील लोकांच्या घरात रहायला मिळणार आहे. हे आयकॉन्स तुम्ही आतापर्यंत फक्त कल्पना केली असेल अशा त्यांच्या विश्वात तुम्हाला घेऊन जाणार आहेत. आता तुम्ही फेरारी म्युझियम मध्ये झोपू शकता, एखाद्या राजकुमाराच्या पर्पल रेन हाऊसमध्ये राहू शकता, आणि बॉलिवूड आयकॉन जान्हवी कपूरच्या समुद्रकिनारी वसलेल्या घरात एक दिवस व्यतित करू शकता. एअरबीएनबीवर आज आम्ही असे पहिले ११ आयकॉन आणणार आहोत. त्यामुळे या वर्षांत जगभर असे अनेक अनुभव तुम्हाला घेता येतील.एअरबीएनबी इंडिया, दक्षिणपूर्व आशिया, हाँगकाँग, तैवान चे व्यवस्थापक अमनप्रीत बजाज म्हणाले,आयकॉन्स असे जादुई आणि कल्पनातीत असणारे अनुभव देतात. आयकॉन्सच्या लाँचचा एक भाग म्हणून जान्हवी कपूर बरोबर या कॅम्पेनसाठी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या कॅम्पेनमुळे जान्हवीच्या समुद्र किनाऱ्यावरील घराची झलक बघायला मिळेल.   लाँचचा भाग म्हणून बॉलिवूड सुपरस्टार जान्हवी कपूर तिच्या चेन्नईच्या घराचे दरवाजे खुले करणार आहे. ही तिची कौटुंबिक मालमत्ता आहे असून हा अभूतपूर्व अनुभव असेल. पडद्यावर अतिशय कसदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या जान्हवीचं घर या प्रमोशनल कॅम्पेन अंतर्गत दोन पाहुण्यांसाठी खुलं करण्यात येणार आहे.समुद्राच्या अगदी समोर वसलेलं जान्हवीचं हे घर म्हणजे उबदारपणाचा आणि शांततेचा परिपाक आहे. ती लहान असताना उन्हाळाच्या सुट्टीत अनेकदा तिच्या कुटुंबाबरोबर या घरात यायची आणि आता पहिल्यांदाच ते एअरबीएनबीच्या गेस्टसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे इथे येणारे पाहुण्यांना कपूर घराण्याच्या परंपरेची आणखी जवळून ओळख होईल आणि एखाद्या बॉलिवूड स्टार सारखा ते या जागेचा आनंद घेऊ शकतील.

Load More Related Articles

Check Also

इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा, 

  इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढा…