Home शासकीय कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित 73 मतदान केंद्रांची स्थापना

कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित 73 मतदान केंद्रांची स्थापना

42 second read
0
0
33

no images were found

कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित 73 मतदान केंद्रांची स्थापना

 

कोल्हापूर : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात मतदान होत आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित (थिमॅटिक) 73 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यांपैकी कोल्हापूर शहरात 12 व इचलकरंजी शहरात 6 अशी शहरी भागात  18 तर जिल्ह्यात 55 अशी नाविन्यपूर्ण मतदान केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय गुलाबी (पिंक), युवा व दिव्यांग मतदान केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. 

जिल्ह्यातील थिमॅटीक मतदान केंद्रांची माहिती पुढील प्रमाणे – तालुका, ग्रामपंचायतीचे नाव व थीम याप्रमाणे-

 पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कोडोली- लोकशाहीचा उत्सव, ग्रामपंचायत वाघुर्डे – बाल स्नेही गाव,  ग्रामपंचायत दिगवडे- पर्यावरण पूरक गाव

शाहुवाडी तालुक्यातील आंबा ग्रामपंचायत -वन उत्पादने/ग्रीन हाऊस,  ग्रामपंचायत बांबवडे- बांबू हाऊस, ग्रामपंचायत सरुड- क्लीन अँड ग्रीन व्हिलेज, ग्रामपंचायत भेडसगाव -जैव विविधता

गगनबावडा तालुक्यातील ग्रामपंचायत गगनबावडा- स्थानिक उत्पादन- करवंदे, फणस, जांभूळ, अळू प्रॉडक्ट्स इत्यादी, ग्रामपंचायत असळज- ग्रामीण पर्यटन, अणदुर ग्रामपंचायत- जलसंवर्धन/ सेव्ह वॉटर

शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत नांदणी- भाजीपाला उत्पादक गाव, अब्दुललाट – खिद्रापूर मंदिर वास्तूकला, ग्रामपंचायत आगर- इंडस्ट्रियल हब, ग्रामपंचायत धरणगुत्ती -ग्रीन हाऊस, ग्रामपंचायत औरवाड- नद्यांचा संगम आणि घाटाचे दृश्य, ग्रामपंचायत टाकळी – सैनिकांचे गाव

करवीर तालुक्यातील- ग्रामपंचायत उजळाईवाडी – विमानतळ, ग्रामपंचायत कळंबा- गुऱ्हाळ घर,  ग्रामपंचायत महे- सेंद्रिय शेती, ग्रामपंचायत खेबवडे -सैनिक गाव

हातकणंगले तालुक्यातील- माणगाव ग्रामपंचायत- मूलभूत हक्क आणि कर्तव्य, शिरोली पुलाची ग्रामपंचायत- उद्योग:आर्थिक विकासाचा पाया, ग्रामपंचायत आळते- शांततापूर्ण जीवनाचे महत्त्व, ग्रामपंचायत पट्टणकोडोली – लघुउद्योगाचे महत्व, ग्रामपंचायत हुपरी- सिल्व्हर सिटी (चांदी व्यवसाय), ग्रामपंचायत कुंभोज- आधुनिक शिक्षण पद्धती, ग्रामपंचायत संभापूर- माझा गाव सुंदर गाव,  ग्रामपंचायत अंबप- हरित गाव

चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत जांबरे- हरित व स्वच्छता ग्राम (जलसमृद्ध), ग्रामपंचायत बसर्गे- आत्मनिर्भर ग्राम (रेशीम उद्योग), ग्रामपंचायत कोदाळी- तिलारी नगर हरित व स्वच्छ ग्राम (जैव विविधता), ग्रामपंचायत हाजगोळी – बालस्नेही गाव, ग्रामपंचायत गुडवळे खा.- हरित व स्वच्छ ग्राम (बांबू लागवड), ग्रामपंचायत करेकुंडी -हरित व स्वच्छ ग्राम (जलसमृद्ध)

आजरा तालुक्यातील- ग्रामपंचायत कोरिवडे- आजरा तालुक्याची विविधता, ग्रामपंचायत वाटंगी- पर्यटन स्थळांची प्रसिद्धी, ग्रामपंचायत उत्तुर – धार्मिक व सांस्कृतिक, ग्रामपंचायत मुमेवाडी- उत्सव लोकशाहीचा देखावा

गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामपंचायत नेसरी- टीव्ही, मोबाईल, संगणक अतिवापराचे दुष्परिणाम, ग्रामपंचायत दुंडगे- पृथ्वी वाचवा, ग्रामपंचायत हेव्वाळ जलद्याळ- जलसंवर्धन, ग्रामपंचायत ऐनापुर – बालस्नेही गाव

भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचायत पाटगाव – मधाचे गाव पाटगाव, ग्रामीण पर्यटन, ग्रामपंचायत पेठ शिवापूर- ग्रामीण पर्यटन व ऐतिहासिक स्थळे, ग्रामपंचायत मठगाव बश्याचा मोळा -ग्रामीण पर्यटन व जैव विविधता, ग्रामपंचायत अनफ खुर्द- अल्पसंख्यांकांसाठीच्या योजनांवर मतदान केंद्र.

कागल तालुक्यातील- लिंगनूर कापशी – कोल्हापूरी कापशी चप्पल, ग्रामपंचायत आलाबाद- महिला स्नेही ग्रामपंचायत, ग्रामपंचायत व्हन्नुर- बालस्नेही ग्रामपंचायत, 

ग्रामपंचायत कौलगे- सैनिकांचे गाव, ग्रामपंचायत बानगे- कुस्तीचे गाव, ग्रामपंचायत सुळकूड- भात लागवडीसाठी प्रसिद्ध गाव, ग्रामपंचायत कापशी- सरसेनापती घोरपडे यांचे जन्मगाव

राधानगरी तालुक्यातील- ग्रामपंचायत फेजीवडे- दाजीपूर अभयारण्य, ग्रामपंचायत सरवडे- राधानगरीचा शिष्यवृत्ती पॅटर्न. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…