Home शासकीय आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन

आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन

32 second read
0
0
246

no images were found

आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन

कोल्हापूर :  जिल्हा कौशल्य विकास,  रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्या महास्वंयम  पोर्टलवर  उमेदवारांनी नोंदणी (एम्लॉयमेंट कार्ड) केलेली आहे. परंतु एम्लॉयमेंट कार्डला आपला आधार कार्ड नंबर, ई-मेल, मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, अशा उमेदवारांनी एम्लॉयमेंट कार्डला आपला आधार कार्ड नंबर, ई-मेल, मोबाईल नंबर लिंक करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उ्द्योजकताचे सहायक आयुक्त सं.कृ.माळी यांनी केले आहे.

माहिती अद्यावत करण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळाच्या मुख्य पृष्ठावरील  ( Home page) वरील रोजगार  (Employment) हा पर्याय निवडून नोकरी साधक (Job Seeker) हा पर्याय निवडून आपला युजर आयडी व पासवर्ड वापरुन Login व्हावे व आधार नंबर या ठिकाणी आपला आधार नंबर नमूद करुन कॅप्च्या (Captcha) टाकून सबमिट  (Submit) या बटनावर क्लिक करावे, जेणेकरून आपली माहिती अद्यावत होईल.

सेवायोजन कार्डशी आधार लिंक करताना, काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्राचा दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर संपर्क साधावा, असेही श्री. माळी यांनी कळविले आहे.

                                         नवीन नाव नोंदणी पाथ (Employment card)

 www.mahaswayam.gov.in    Home Page  →   Employment  →  Job Seeker   → Login

आधार कार्ड लिंक  करण्याचा पाथ

ज्या उमेदवारांनी  वेबपोर्टलवर (Employment card) काढले आहे.

www.mahaswayam.gov.in   →   Home Page  →  Employment   →  Job Seeker   →    User ID   →  Pass Word   →    Login     Adhar Number   →    Captcha   → (Submit) या बटनावर क्लिक Ûú¸üÖ¾Öê.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…