Home सामाजिक बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सने प्राइव्हचे अनावरण

बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सने प्राइव्हचे अनावरण

3 min read
0
0
26

no images were found

बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सने प्राइव्हचे अनावरण

 

 

भारतातील आघाडीच्या खासगी सामान्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सने आज प्राइव्ह अनावरणाची घोषणा केली, जो उन्नत आणि अतुलनीय ग्राहक सेवा उत्कृष्टतेच्या दालनांत प्रवेश सुकर करणारा एक विशेष ग्राहक अनुभव कार्यक्रम आहे. पारंपारिकपणे, गेल्या काही वर्षांमध्ये भारतात विम्याचा प्रसार वाढविण्याचा हा एक प्रयत्न असून, मुख्यत्वे मध्यम, उच्च मध्यमवर्ग आणि ग्रामीण ग्राहकांना सामावून घेणारा, श्रेणी २/ श्रेणी ३ शहरे आणि ग्रामीण बाजारपेठेतील ग्राहक पाया विस्तारण्यावर केंद्रित कार्यक्रम आहे.

प्राइव्हचा भाग बनण्यासाठी, ग्राहकांना आरोग्य, घर, मोटर, वैयक्तिक अपघात आणि सायबर धोके, त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार विमा या सर्वांमध्ये सुयोग्य विमा योजना निवडण्याची लवचिकता आहे. विमा योजनांमध्ये सध्या माय हेल्थ केअर प्लॅनचा समावेश आहे, ज्यामध्ये पात्रता निकष म्हणून किमान विमा कवचाची रक्कम १ कोटी रुपये आहे; ग्लोबल हेल्थ केअर अंतर्गत परदेशी वैद्यकीय उपचार, आणि आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत नियोजित आणि आपत्कालीन उपचारांसारखे संरक्षण दिले जाते आणि ग्राहकांना पात्रतेसाठी विमा कवचाच्या रकमेपैकी कोणताही पर्याय निवडता येऊ शकेल. याव्यतिरिक्त, व्ही-पे ॲड-ऑन  कव्हरसह मोटर विमा योजनेचे संरक्षण दिले जाईल. हे अतिरिक्त (एड-ऑन) संरक्षण वेगवेगळ्या मोटर विम्याच्या विविध वर्धित (एड-ऑन) फायदे एकत्रित रूपात एका योजनेअंतर्गत प्रदान करते, ज्यासाठी मोटार वाहनासाठी किमान विमा घोषित मूल्य (इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू – आयडीव्ही) २५ लाख रुपये किंवा अधिक आवश्यक आहे. माय होम इन्शुरन्स ऑल रिस्क पॉलिसी ही घराची रचना आणि घरातील मौल्यवान सामग्री या दोन्हीसाठी सर्वसमावेशक विमा संरक्षण सुनिश्चित करते. येथे पात्रता निकष हा रचनेसाठी किमान विमा रक्कम ३ कोटी रुपये, उचलता, हलवता न येणाऱ्या सामग्रीसाठी ३० लाख रुपये आणि हलवल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी ६ लाख रुपये असेल. शिवाय, वरील योजनांच्या संयोगाने, ग्राहक ग्लोबल पर्सनल गार्ड पॉलिसी सारख्या प्रगत योजनांसाठी विम्याच्या उच्च श्रेणीची देखील निवड करू शकतात जे अतिरिक्त वर्धित फायद्यांच्या श्रेणीसह जगभरात वैयक्तिक अपघात संरक्षण आणि सतत विकसित होत असलेल्या डिजिटल चलनवलनामुळे संभवणाऱ्या सायबर हल्ल्यांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी सायबर केअर प्लॅन प्रदान करते.

प्राइव्हच्या अनावरणाप्रसंगी बोलताना, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. तपन सिंघेल म्हणाले, “देशातील प्रत्येक व्यक्तीच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या विमा उपायांसाठी आम्ही समर्पित आहोत आणि हीच बाब आमच्या केंद्रस्थानी आहे. प्राइव्हच्या अनावरणासह, आम्ही निरंतर नाविन्यपूर्णता आणि विवेकी व्यक्तींच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेलाच अधोरेखित केले आहे. आम्ही ग्राहकांचे अत्याधुनिक मालमत्ता पोर्टफोलिओ, चोख आर्थिक नियोजन आणि त्यांची विशिष्ट जीवनशैली पाहता पारंपरिक नियमांच्या पलीकडे जाणाऱ्या विमा योजनांबाबत त्यांच्या गरजांना आम्ही पुरेपूर ध्यानात घेतो. प्राइव्ह हे अशाच अनन्य ग्राहकांच्या विवेकी प्राधान्या

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…