no images were found
आपल्या आईसाठी जोडीदार शोधण्याचा एका लहान मुलाचा निरागस प्रयत्न!
आपल्या सिंगल आईच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी प्रयत्नशील छोट्या किआनची मनाला सुखावणारी कथा पहा ‘मैं हूँ साथ तेरे’ मध्ये, प्रीमिअर होत आहे 29 एप्रिलपासून संध्याकाळी 7.30 वाजता फक्त झी टीव्हीवर
कधी कुठल्या छोट्या मुलाला आपल्या आईसाठी जोडीदार शोधताना पाहिले आहेत का? तो आपल्या आयुष्यात वडिलांना मिस करतो आहे म्हणून नाही तर त्याला त्याच्या आईला तिचे आयुष्य एकटीने जगताना आणि सगळ्या गोष्टी स्वतःच करत झटताना पाहायचे नाहीये म्हणून… गेली तीन दशके विचारांना प्रवृत्त करणाऱ्या आणि मनाला भावतील अशा कथा आपल्या प्रेक्षकांसाठी आणण्यामध्ये झी टीव्ही ही वाहिनी नेहमीच अग्रगण्य राहिलेली आहे. आता आपली नवीन मालिका ‘मैं हूँ साथ तेरे’ सोबत प्रेक्षकांच्या हृदयाच्या तारा छेडण्यासाठी पुन्हा एकदा ही मालिका सज्ज आहे.
ही कथा आहे एका सिंगल आई जान्वीची, जिला आई आणि वडिल अशा दोहोंची भूमिका निभावताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. ग्वाल्हेरस्थित ही मालिका आपल्याला भावभावनांच्या रोलरकोस्टर राईडवर घेऊन जाईल कारण आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू असलेल्या किआनला कायम खुश ठेवण्यासाठी जान्वी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असते. किआनला आपल्या आयुष्यात वडिलांची उणीव भासत नसली, तरी आपल्या आईच्या आयुष्यात तिच्या जोडीदाराची कमी त्याला जाणवत असून ती एकटीच सगळ्या गोष्टी करत असताना तो पाहत असतो. ही कथा अधिक रंगतदार होत जाते जेव्हा जान्वीची ओळख एका समृद्ध व्यावसायिक आर्यमनसोबत होते आणि ते एकाच छताखाली काम करू लागतात. आर्यमन जान्वीमध्ये आपली रूचि व्यक्त करतो, पण काय किआनला ते चालेल आणि काय तो आपल्या सिंगल आईला तिच्यावर प्रेम करणाऱ्या पुरूषाच्या जवळ जाण्यामध्ये भूमिका निभावेल…? पहा फूल हाऊस मीडिया निर्मित ‘मैं हूँ साथ तेरे’, प्रीमिअर होत आहे 29 एप्रिलपासून दररोज संध्याकाळी 7.30 वाजता फक्त झी टीव्हीवर.
‘मैं हूँ साथ तेरे’चे प्रेक्षक किआनला त्याची आई जान्वीसाठी त्याने आर्यमनला पाठिंबा द्यावा म्हणून समर्थन देतील. आपल्या अख्ख्या बालपणात वडिलांच्या प्रेमाला पारखा असलेल्या किआनचे आपली आई जान्वीसोबत सुंदर नाते निर्माण होते. आणि ही प्रेमकथा उलगडताना किआन ह्या नात्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. झी टीव्हीवरील ह्या मालिकेत प्रेम, आयुष्य आणि नातेसंबंधांकडे निरागस दृष्टीने पाहण्यासाठी सज्ज व्हा.
जान्वी आणि किआन यांच्या भूमिका अनुक्रमे उल्का गुप्ता आणि गोड बालकलाकार निहान जैन साकारत असून आर्यमनची भूमिका दुसरातिसरा कोणी नाही तर टेलिव्हिजन हार्टथ्रॉब करण वोहरा साकारणार आहे. ह्या मालिकेच्या प्रोमोला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद लाभला आणि ह्या मालिकेबद्दल एवढे औत्सुक्य निर्माण केल्यानंतर ‘मैं हूँ साथ तेरे’ ह्या मालिकेचे अनावरण प्रसारमाध्यमांसमोर मुंबईमध्ये एका मेगा लॉंचमध्ये करण्यात आले, जिथे आपल्या आईसाठी आर्यमन योग्य जोडीदार आहे की नाही हे ठरवण्यासाठी किआनने आर्यमनला अनेक आव्हाने दिली.
निर्माती सोनाली जाफर, फूल हाऊस मीडिया प्रा.लि. म्हणाले, “आपल्या आईसाठी जोडीदार शोधणारा लहान मुलगा आपल्याला काही दररोज पाहायला मिळत नाही, त्यामुळे त्यादृष्टीने आमची संकल्पना खरोखरीच वेगळी आहे. ‘मैं हूँ साथ तेरे’ हे केवळ एक कौटुंबिक नाट्य नाहीये, तर यात सिंगल आई असलेली जान्वी आणि आपली आई आणि तिच्या आनंदाची खरोखरीच पर्वा करणारा तिचा मुलगा किआन यांच्या दृष्टीने ह्या मालिकेत प्रेम, आयुष्य आणि नातेसंबंधांकडे निरागसपणे पाहण्यात आले आहे. ह्या प्रेमकथेची नियती एक लहान मूल ठरवणार आहे. ही एक हृदयस्पर्शी कथा असून ती कोमल भावनांना स्पर्श करते आणि आम्हांला आशा आहे की आमच्या प्रेक्षकांनाही ही मालिका आपलीशी वाटेल.”
करण वोहरा म्हणाला, “स्त्रीकेंद्रित मालिकांमध्ये पुरूषांसाठीही रंजक व्यक्तिरेखा असू शकतात ह्या गोष्टीवर आर्यमनसारख्या व्यक्तिरेखेसह माझा विश्वास बसला. मला वाटतं माझी व्यक्तिरेखा आणि ही हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. ऑनस्क्रीन किआनसाठी वडिलांच्या जागी असलेल्या पुरूषाची भूमिका साकारण्यसाठी मी उत्साहित आहे कारण माझा विश्वास आहे की ह्या भूमिकेच्या माध्यमातून जेव्हा माझी जुळी मुले किआनच्या वयाची होतील तेव्हा त्यांच्यासाठी एक चांगला पिता मला बनता येईल. हे नाजूक नातेसंबंध आमच्या कथेचे आधारस्तंभ असून आशा आहे की ही कथा आमच्या प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचेल.”
उल्का गुप्ता म्हणाली, “ह्या नवीन प्रवासाबद्दल मी अतिशय उत्साहात आहे आणि थोडीशी नर्व्हससुद्धा. जेव्हा मला ह्या भूमिकेसाठी विचारण्यात आले तेव्हा ती माझ्याचसाठी असल्याचे माझ्या लक्षात आले. आपल्या परिवारावर खूप प्रेम करणे, आपली आवड जोपासणे आणि एक स्त्री म्हणून विभिन्न जबाबदाऱ्या निभावताना संतुलन साधणे अशा अनेक बाबतीत ती आणि मी सारख्याच आहोत. ही गोष्ट रोचक आहे की माझ्या करिअरमध्ये एवढ्या लवकर मला आईची भूमिका साकारायला मिळत आहे. जान्वीची भूमिका साकारताना माझी आईच माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे. भारतीय टेलिव्हिजनवर एका सिंगल आईची भूमिका साकारणे ही एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला आशा आहे की जान्वीचा साधेपणा, ऊब आणि प्रतिकूल परिस्थितीमध्येही कधी हार न पत्करण्याची वृत्ती ही प्रेक्षकांना प्रेरित करेल.”